शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 17:33 IST

बौद्ध धर्मग्रंथांचा उल्लेख करत लामा म्हणाले, लोक कोणत्याही विचारसरणीचे असोत, शेवटी प्रत्येकाचे ध्येय आनंद मिळवणे हेच आहे...

तिबेटियन आध्यात्मिक गुरु दलाई लामा यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्यासंदर्भात सुरू असलेल्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. यासंदर्भात बोलताना, आशा आहे की, आपण आणखी 30 ते 40 वर्ष जगू आणि लोकांची सेवा करत राहू, असे दलाई लामा यांनी म्हटले आहे. ते रविवारी हिमाचल प्रदेशातील मॅकलिओडगंज येथील त्सुगलाखांग मंदिरात त्यांच्या ९० व्या वाढदिवसापूर्वी आयोजित दीर्घायुष्य प्रार्थना समारंभात बोलत होते. या कार्यक्रमाला १५,००० हून अधिक लोक उपस्थित होते.

14वे दलाई लामा तेनजिन ग्यात्सो म्हणाले, आपल्याला “स्पष्ट संकेत” मिळत आहेत की, बोधिसत्व अवलोकितेश्वर यांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे. अनेक भाकितं आणि संकेतांच्या आधारे, मी १३० वर्षांपर्यंत जिवंत राहील, असा मला पूर्ण विश्वास आहे. मी आतापर्यंत माझ्या संपूर्ण क्षमतेने तिबेटियन लोक आणि बौद्ध धर्माची सेवा केली आहे आणि यापुढेही करत राहीन.”

दलाई लामा म्हणाले, मी लहाण असल्यापासूनच मी अवलोकितेश्वरांशी जोडलो गेलो आहे. मला नेहमीच असे वाटत आले आहे की, माझ्या जीवनाचा उद्देश इतरांची सेवा करणे हा आहे. मी जिथे राहीन लोकांना लाभ पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत राहीन."

उत्तराधिकारी घोषित करण्यास नकार -बौद्ध धर्मग्रंथांचा उल्लेख करत लामा म्हणाले, लोक कोणत्याही विचारसरणीचे असोत, शेवटी प्रत्येकाचे ध्येय आनंद मिळवणे हेच आहे. आपण दुःखात असलेल्यांसाठी काम केले पाहिजे. मग ते कोणत्याही पंथाचे अथवा राष्ट्राचे असोत. सर्वांना शांतता आणि सूख हवे आहे." उत्तराधिकाऱ्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, "यासंदर्भात अद्याप कसलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. आपण आणखी 30-40 वर्ष जगू, अशी आशा आहे."

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामाHimachal Pradeshहिमाचल प्रदेशchinaचीन