आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 17:33 IST2025-07-05T17:31:46+5:302025-07-05T17:33:12+5:30
बौद्ध धर्मग्रंथांचा उल्लेख करत लामा म्हणाले, लोक कोणत्याही विचारसरणीचे असोत, शेवटी प्रत्येकाचे ध्येय आनंद मिळवणे हेच आहे...

आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
तिबेटियन आध्यात्मिक गुरु दलाई लामा यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्यासंदर्भात सुरू असलेल्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. यासंदर्भात बोलताना, आशा आहे की, आपण आणखी 30 ते 40 वर्ष जगू आणि लोकांची सेवा करत राहू, असे दलाई लामा यांनी म्हटले आहे. ते रविवारी हिमाचल प्रदेशातील मॅकलिओडगंज येथील त्सुगलाखांग मंदिरात त्यांच्या ९० व्या वाढदिवसापूर्वी आयोजित दीर्घायुष्य प्रार्थना समारंभात बोलत होते. या कार्यक्रमाला १५,००० हून अधिक लोक उपस्थित होते.
14वे दलाई लामा तेनजिन ग्यात्सो म्हणाले, आपल्याला “स्पष्ट संकेत” मिळत आहेत की, बोधिसत्व अवलोकितेश्वर यांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे. अनेक भाकितं आणि संकेतांच्या आधारे, मी १३० वर्षांपर्यंत जिवंत राहील, असा मला पूर्ण विश्वास आहे. मी आतापर्यंत माझ्या संपूर्ण क्षमतेने तिबेटियन लोक आणि बौद्ध धर्माची सेवा केली आहे आणि यापुढेही करत राहीन.”
दलाई लामा म्हणाले, मी लहाण असल्यापासूनच मी अवलोकितेश्वरांशी जोडलो गेलो आहे. मला नेहमीच असे वाटत आले आहे की, माझ्या जीवनाचा उद्देश इतरांची सेवा करणे हा आहे. मी जिथे राहीन लोकांना लाभ पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत राहीन."
उत्तराधिकारी घोषित करण्यास नकार -
बौद्ध धर्मग्रंथांचा उल्लेख करत लामा म्हणाले, लोक कोणत्याही विचारसरणीचे असोत, शेवटी प्रत्येकाचे ध्येय आनंद मिळवणे हेच आहे. आपण दुःखात असलेल्यांसाठी काम केले पाहिजे. मग ते कोणत्याही पंथाचे अथवा राष्ट्राचे असोत. सर्वांना शांतता आणि सूख हवे आहे." उत्तराधिकाऱ्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, "यासंदर्भात अद्याप कसलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. आपण आणखी 30-40 वर्ष जगू, अशी आशा आहे."