माझ्या हातात कर्म आहे, निकाल नाही- बेदी

By Admin | Updated: February 10, 2015 00:56 IST2015-02-10T00:56:18+5:302015-02-10T00:56:18+5:30

नवी दिल्ली : निकालाबाबत मी निराश नाही, कारण तो माझ्या हातात नाही. केवळ कर्मच माझ्या हातात आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी दिली आहे.

I have a karma in my hands and not a result - Bedi | माझ्या हातात कर्म आहे, निकाल नाही- बेदी

माझ्या हातात कर्म आहे, निकाल नाही- बेदी

ी दिल्ली : निकालाबाबत मी निराश नाही, कारण तो माझ्या हातात नाही. केवळ कर्मच माझ्या हातात आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी दिली आहे.
गेल्या १७ दिवसांत मी माझे सर्व दिले आहे. माझ्याकडे असलेला वेळ मी ईश्वराच्या इच्छेनुसार दिला आहे. कोणत्याही परीक्षेत सवार्ेत्तम ते दिल्यानंतर मला गाढ झोप लागलेली आहे. निकाल माझ्या हातात नाही, पण कर्म आहेत. खूप मेहनत घेऊन सवार्ेत्तम देणे हाच माझा स्वभाव आहे. मी निराश होणार नाही. मी भ्याड असते तर आयपीएस अधिकारी बनले नसते, असेही त्या म्हणाल्या.
------------------
पराभव झाल्यास माकन
यांचा राजीनामा
सदर बाजार मतदारसंघातून पराभव झाल्यास अजय माकन यांनी काँग्रेसचे सरचिटणीसपद किंवा संपर्क विभागाच्या प्रमुखपदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे. त्याबाबत त्यांनी निकटस्थ सहकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या मतदारसंघातील तिरंगी लढतीत माकन हे केवळ ११ टक्के मते घेत तिसऱ्या स्थानी राहतील, असा अंदाज निवडणूक सर्वेक्षणांनी व्यक्त केला आहे.

Web Title: I have a karma in my hands and not a result - Bedi