शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'मला अनेक देशांकडून सप्टेंबरपर्यंतची निमंत्रणं, त्यांनाही माहीत आहे...'; PM मोदी स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 17:58 IST

भाजपच्या या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या कामगिरीचा लेखा जोखाच मांडला नाही, तर तिसऱ्या टर्मसाठी शड्डूही ठोकला आहे.

लोकसभानिवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर पंतप्रदान नरेद्र मोदी यांनी रविवारी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच निवडणुकीच्या आखाड्यात उतण्यापूरर्वी कार्यकर्त्यांना गुरुमंत्रही दिला. भाजपच्या या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या कामगिरीचा लेखा जोखाच मांडला नाही, तर तिसऱ्या टर्मसाठी शड्डूही ठोकला आहे. एवढेच नाही, तर काँग्रेसला अस्थिरतेची जननी म्हणत, आपल्याला सप्टेंबरपर्यंत विविध देशांकडून निमंत्रणे आली आहेत, त्यांनाही माहीत आहे की, येणार तर मोदीच.

काँग्रेसवर निशामणा साधत मोदी म्हणाले, गेल्या 5 वर्षांपूर्वी त्यांनी भारताला राफेल मिळू नये म्हणून प्रयत्न केले. HAL ला नष्ट केले जात आहे, अशी चुकीची माहिती पसरवली. आज HAL चे बाजारमूल्य किती वाढले आहे, ते बघा. हे तेच लोक आहेत ज्यांनी एअर स्ट्राइकचे पुरावे मागितले होते. काँग्रेस किती गोंधळात आहे, याचे उदाहरण म्हणजे, काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत संघर्ष आहे. विशेष म्हणजे, ही सिद्धांताची लढाई नाही.

'काँग्रेसमध्ये सैद्धांतिक विरोध' -राष्ट्रीय अधिवेशनात मोदी म्हणाले, 'काँग्रेसमध्ये एक गट असा आहे, जो म्हणतो, मोदींची प्रतिमा मलिन करण्यासाठी सर्व प्रकारचे डावपेच वापरा आणि एक वर्ग असा आहे, जो म्हणतो, मोदींवर वैयक्तिक टीका करू नका. काँग्रेसमध्ये सैद्धांतिक विरोध करण्याचे धाडसही उरलेले नाही, यामुळे ती केवळ मोदींना विरोध करण्यापूरतीच उरली आहे. "यही समय है, सही समय है", असे मी लाल किल्यावरून म्हटले होते. देशाचे भविष्य बदलण्याची वेळ आली आहे.

पीएम मोदी पुढे म्हणाले, परराष्ट्र विषयक धोरणाच्या जाणकारांना परदेशातून मिळणारे संकेत समजत आहेत. भारत मजबूत झाल्यास, सर्वांनाच फायदा होईल, असा विश्वास इतर देशांतील सत्ताधारी आणि विरोधकांना आहे. सर्व देश आपल्यासोबत चांगले संबंध प्रस्थापित करत आहेत. आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की, माझ्याकडे सप्टेंबर महिन्यांतील निमंत्रणेही येऊन पडलेली आहेत आणि जगातील सर्व देशांना माहीत आहे की, येणार तर मोदीच."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक