आपण बौद्ध धर्माचे पालन करतो, मात्र कोणत्याही धर्माचे सखोल अध्ययन केलेले नाही. आपण धर्मनिरपेक्ष असून हिंदू, शीख, मुस्लीम, ख्रिश्चन आदी सर्व धर्मांवर आपला विश्वास आहे, असे भारताचे मुख्य न्यायमूर्ती (CJI) बी. आर. गवई यांनी म्हटले आहे. ते सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स-ऑन-रेकॉर्ड असोसिएशन (SCAORA) तर्फे आयोजित निरोप समारंभावेळी बोलत होते.
CJI गवई म्हणाले, "ही विचारसरणी आपल्याला आपल्या वडिलांकडून मिळाली, जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी होते. गवई यांनी स्पष्ट केले की, कुटुंबात कोणत्याही दर्ग्याची माहिती मिळाली की, तेथेही ते जात असत. आपल्यासाठी धर्मापेक्षाही माणुसकी आणि संविधान अधिक महत्त्वाचे आहे."
संविधान आणि डॉ. आंबेडकरांमुळेच हा प्रवास शक्य झाला - "आपला हा संपूर्ण प्रवास संविधान आणि डॉ. आंबेडकरांमुळेच शक्य झाला. मी आज जो काही आहे, तो याच संस्थेमुळे (सुप्रीम कोर्ट) आहे. एका महानगरपालिकेच्या शाळेत जमिनीवर बसून शिकणारा मुलगा, इथवर पोहोचू शकेल, असा विचार करू शकत नव्हता. आपण नेहमीच, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या संविधानाच्या चार मूल्यांचे पालन करण्याचा प्रयत्न केला, असेही गवीई म्हणाले. ते 23 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहे. 22 नोव्हेंबर हा त्यांचा सुप्रीम कोर्टातील कामकाजाचा शेवटचा दिवस असेल.
Web Summary : CJI Gavai, retiring soon, credits his success to the Constitution, Ambedkar, and the Supreme Court. A secular individual, he respects all religions and emphasizes humanity and the Constitution's importance, inspired by his father's values.
Web Summary : CJI गवई, जल्द ही सेवानिवृत्त हो रहे हैं, अपनी सफलता का श्रेय संविधान, अम्बेडकर और सुप्रीम कोर्ट को देते हैं। एक धर्मनिरपेक्ष व्यक्ति होने के नाते, वह सभी धर्मों का सम्मान करते हैं और अपने पिता के मूल्यों से प्रेरित मानवता और संविधान के महत्व पर जोर देते हैं।