जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी सेन्याकडून सीमेवर झालेल्या गोळीबारात 25 पंजाब रेजिमेंटचे सूबेदार मेजर पवन कुमार यांना हौतात्म्य आले आहे. सूबेदार मेजर पवन कुमार हे हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील शाहपुरमधील वार्ड क्रमांक चार येथील रहिवासी होते. त्यांच्या हौतात्म्यासंदर्भात बोलताना, 'मुलाचे बलिदान आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. कारण जे मी करू शकलो नाही, ते मुलाने करून दाखवले.' अशा शब्दात पवनकुमार यांचे वडील माजी सैनिक गरज सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांसोबत बोलत होते. माजी सैनिक गरज सिंह हेही पंजाब रेजिमेंटचाच भाग होते. याच रेजिमेंटमध्ये पवन कुमारही तैनात होते. पुंछमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात त्यांना हौतात्म्य आले आहे. गरज सिंह यांना आपल्या मुलाच्या बलिदानाची माहिती शनिवार सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास मिळाली.
31 औगस्टला होणार होते निवृत्त - पवन याच वर्षात ३१ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी आहेत. त्यांच्या पार्थिवावर शाहपूर येथेच शासकीय सत्मामात अंत्य संस्कार होतील. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा, हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू आणि विरोधी पक्षनेते जय राम ठाकूर यांनी गरज सिंह यांना फोन केला होता, तेव्हा त्यांचा आवाज शांत होता.गराज सिंह म्हणाले, 'ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीसंदर्भात चिंता होती. मी माझ्या मुलाला सुरक्षिततेसंदर्भात फोनवरून विचारले होते. तो म्हणाला होता काळजीचे कारण नाही. आज फोनवरून कळवण्यात आले की, त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. मला समजले, जर डोक्याला दुखापत आहे, तर ती गंभीर आहे.' पूंछमधील कृष्णा घाटी येथे पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात पवन कुमार जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी तेथेच अखेरचा श्वास घेतला. त्यांचे वडील म्हणाले की, आपण हिंमत एकवटली आणि कुटुंबातील सदस्यांना कळवले.