मला अपराधी वाटतेय, मुंबई-गोवा, सीधी-सिंगरौली हायवेंवर पुस्तक लिहिता येईल - गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 13:59 IST2023-08-02T13:57:40+5:302023-08-02T13:59:45+5:30
काय उदाहरण ठेवलेय आपण देशासमोर? मुंबई-गोवा महामार्गाचे किती वर्षे झाले काम सुरु आहे... गडकरींनाही अपराधी वाटतेय...

मला अपराधी वाटतेय, मुंबई-गोवा, सीधी-सिंगरौली हायवेंवर पुस्तक लिहिता येईल - गडकरी
आज राज्यसभेत एका प्रश्नावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कुठे स्तुती तर कुठे हतबलता अनुभवली. कामकाजावेळी त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी विचारलेल्या प्रश्नावर गडकरींनी मला अपराधी असल्यासारखे वाटतेय, मुंबई-गोवा, सीधी-सिंगरौली हायवेंवर एक पूर्ण पुस्तक लिहून होईल असे गडकरी म्हणाले.
भाजप खासदार अजय प्रताप यांनी गडकरींचे कौतुक करताना म्हटले की, संपूर्ण देशात त्यांची ख्याती आहे, मात्र सिधी-सिंगरौली रस्त्याबाबत तेथील जनता निराश झाली आहे. यावर राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनाही हसू आले. गडकरींच्या वाहतूक क्षेत्रातील कामाचेही त्यांनी कौतुक केले. केवळ भारतातच नाही तर देशाबाहेरही त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे, असे धनखड म्हणाले.
सिंहांच्या या मुद्द्यावर गडकरींनी उत्तर दिले. हे अगदी बरोबर आहे. याचे उत्तर देताना मला अपराधी वाटते. मुंबई ते गोवा आणि देशातील सिधी-सिंगरौली यावर संपूर्ण पुस्तक लिहिता येईल, असे गडकरी म्हणाले. या रखडलेल्या रस्त्याची कहाणी सांगताना गडकरी म्हणाले की, हे काम रखडले असताना कोल इंडियाकडे पैसे मागून हा रस्ता करण्याचे समोर आले होते. यावर कोल इंडियाचे प्रस्ताव आले. यावर कोल इंडियाचे प्रस्ताव आले. दुर्दैवी आहे की याचे माझ्याकडे काहीच उत्तर नाही, असे गडकरी म्हणाले.
पहिला कंत्राटदार अपयशी ठरला. ते NCLT मध्ये गेले. तिथे निराशा लागल्यावर ते न्यायालयात गेले. न्यायालयाने स्थगिती दिल्याने हा निवाडा होऊ शकला नाही. नंतर काम दुसर्या कंत्राटदाराला दिल्यावर त्यात फारशी प्रगती झाली नाही. त्याने काम केले नाही तरी त्याला नोटीस आणि वेळ द्यावा लागतो. तो कोर्टात जातो. ही प्रक्रिया आहे. ती केल्याशिवाय काहीच करता येत नाही, अशी उद्विग्नता गडकरी यांनी राज्यसभेत बोलून दाखविली.
काँक्रिटचा रस्ता करण्यासाठी मी ठेकेदाराशी बोललो आहे. त्याला ३३ कोटी देणार. यामुळे खेळते भांडवल पूर्ण होईल. डिसेंबरपर्यंत हे काम ९९ टक्के पूर्ण होईल, असे गडकरींनी आश्वासन दिले.