शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

"आपल्यासाठी मी 'निवृत्ती' शब्द वापरू इच्छित नाही", पंतप्रधान मोदींचं रैनाला पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 21:53 IST

या दोघांच्या निवृत्तीनंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना पत्र लिहिले आहे. जसे पत्र मोदींनी धोनीला लिहिले होते, तसेच पत्र त्यांनी रैनालाही लिहिले आहे. धोनीने वयाच्या 39 व्या वर्षी तर रैनाने अवघ्या ३३व्या वर्षीच निवृत्ती जाहीर केली आहे. 

ठळक मुद्देमोदी म्हणाले, 15 ऑगस्टला आपण आपल्या आयुष्यातला अत्यंत कठीण निर्णय घेतला.मोदी म्हणाले, केवळ फलंदाज म्हणूनच नाही, तर एक गोलंदाज म्हणूनही आपण दिलेले योगदान विसरता येणार नाही. मोदी म्हणाले, मैदानात आपण वाचवलेल्या धावांचा हिशोब लावायचा झालाच तर अनेक दिवस लागतील.

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने सोशल मीडियावरून आपली निवृत्ती जाहीर केली. यानंतर अवघ्या काही मिनिटांतच सुरेश रैनानेही निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना धक्का दिला. धोनीने वयाच्या 39 व्या वर्षी तर रैनाने अवघ्या ३३व्या वर्षीच निवृत्ती जाहीर केली आहे. 

या दोघांच्या निवृत्तीनंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना पत्र लिहिले आहे. जसे पत्र मोदींनी धोनीला लिहिले होते, तसेच पत्र त्यांनी रैनालाही लिहिले आहे. 

रैनाला लिहिलेल्या पत्रात मोदींनी म्हटले आहे, आपण एवढे युवा आहात, तरी निवृत्ती कशी घेतली. 15 ऑगस्टला आपण आपल्या आयुष्यातला अत्यंत कठीण निर्णय घेतला. यासाठी मी ‘निवृत्ती’ असा शब्द वापरू इच्छित नाही, कारण आपण निवृत्त होण्यासाठी फार तरूण आणि ऊर्जावान आहात. क्रिकेटच्या मैदानावर उत्तम खेळी केल्यानंतर आपण आपल्या जीवनातील पुढील डावाची तयारी करत आहात.

केवळ फलंदाज म्हणूनच नाही, तर एक गोलंदाज म्हणूनही आपण दिलेले योगदान विसरता येणार नाही. आपण कर्णधार विश्वास ठेवू शकतो, अशा प्रकारचे गोलंदाज होतात. आपले क्षेत्ररक्षण सर्वोत्तम होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही उत्कृष्ट झेल घेऊन आपण आपली छाप सोडली आहे. मैदानात आपण वाचवलेल्या धावांचा हिशोब लावायचा झालाच तर अनेक दिवस लागतील, असे मोदी म्हणाले.

खेळाडूचे कौतुक मैदानात आणि मैदानाबाहेरदेखील होते. करिअरमध्ये अनेक वेळा दुखापती आणि अन्य अडचणींचा सामना केल्यानंतरही आपण त्यावर मात केली. आपण नेहमीच टीम स्पिरीटसोबत राहिलात. वैयक्तिक विक्रमांसाठी नाही, तर संघ आणि भारताच्या गौरवासाठी खेळलात. मैदानातला आपला उत्साह फार प्रभावी होता आणि आम्ही सर्वांनी पाहिले आहे, की प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज बाद झाल्यानंतर आपण आनंद व्यक्त करण्यासाठी सर्वप्रथम पुढे यायचा.

समाजाप्रति आपली बांधिलकी आणि करुणा आपल्या अनेक कार्यांतून दिसते. आपण महिला सशक्तीकरण, स्वच्छ भारत आणि गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेतलात. मला आनंद आहे की आपण भारताच्या सांस्कृतिक मुळांशी जोडलेले आहात. 

रैनाने असे मानले आभार - पंतप्रधान मोदींनी लिहलेले पत्र सुरैश रैनाने सोशल मीडियावर शेअर करत दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार मानले आहेत. यात त्याने म्हटले आहे, आम्ही देशासाठी खेळत असताना खूप मेहनत घेतो. या देशातील लोकांच्या प्रेमापेक्षा दुसरी कोणतीही प्रेरणा नाही. जेव्हा देशाचे पंतप्रधान आपल्यासाठी असे बोलतात, तेव्हा ती गोष्ट फार मोठी असते. मोदीजी प्रेरणा देणारे शब्ध आणि शुभेच्छा यासाठी धन्यवाद. मनापासून त्याचा स्वीकार करतो. जय हिंद!

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVaccine News : भारतात होणार Sputnik V कोरोना लशीचे उत्पादन? रशिया करतोय अशी 'प्लॅनिंग'

आता फक्त पाण्याने होणार कोरोनाचा खात्मा! केवळ फवारण्याची गरज, ICMRनंही दिली मंजुरी 

CoronaVirus News: चीननं 'या' देशात मजूरांनाच टोचली कोरोना लस, वाद पेटला

CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!

CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!

CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

टॅग्स :Suresh Rainaसुरेश रैनाNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान