शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 08:56 IST

या युवकाचं लग्न एका वर्षापूर्वीच झालं होतं. पत्नी त्याला मारहाण करते आणि गळा दाबून मारण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप पतीने केला आहे.

एकीकडे पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना समोर येत असतानाच आता उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये पत्नीच्या दहशतीचं एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या एका पतीने जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन देत इच्छा मरणाची मागणी केली आहे. 

या युवकाचं लग्न एका वर्षापूर्वीच झालं होतं. पत्नी त्याला मारहाण करते आणि गळा दाबून मारण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप पतीने केला आहे. हा युवक हातात एक फलक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला होता.

लग्न झालं अन्... 

मुजफ्फरनगरच्या गांधीनगर कॉलनीत राहणाऱ्या सुमित सैनीचं लग्न १ जुलै २०२४ रोजी जिल्ह्यातील कुकडा गावात राहणाऱ्या पिंकीशी झालं होतं. सुमितचा आरोप आहे की, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पत्नीने त्याला सांगितलं की, हे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध झालं आहे आणि ती दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करते. त्यानंतर पिंकीने घरात सतत भांडणं करायला सुरुवात केली. ती रोज पतीला मारहाण करायची आणि त्याला मारण्याच्या इराद्याने ती सुमितचा गळाही आवळायची.

भाडोत्री गुंडांकडून पत्नीने करवली मारहाणपीडित पती सुमितने हेही सांगितलं की, पिंकी गेल्या ६ महिन्यांपासून माहेरी राहत आहे, पण या काळातही ती फोनवरून त्याला सतत धमक्या देत असते. त्याचबरोबर गुंडांना पाठवून त्याला मारहाणही करायची. यामुळे त्रस्त आणि हताश होऊन सुमितने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून इच्छामरणाची मागणी केली. यावेळी सुमितने हातात एक फलक धरला होता, ज्यावर त्याने आपल्या समस्या लिहिल्या होत्या.

मला इच्छामरण द्या! पीडित पती सुमित सैनी म्हणाला, "मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आपल्या मुख्यमंत्र्यांकडे मी इच्छामरणाची मागणी करतो. मी माझ्या पत्नीमुळे खूप त्रस्त झालो आहे. माझी पत्नी मला खूप त्रास देत आहे. माझं लग्न १४ जुलै २०२४ रोजी हिंदू रितीरिवाजांनुसार हुंड्याशिवाय झालं होतं. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पत्नी म्हणाली की, मी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करते. माझ्या आई आणि मामांनी माझं लग्न जबरदस्ती तुझ्याशी लावून दिलं आहे." पत्नीने लग्नानंतर लगेचच मारहाण आणि शिवीगाळ करायला सुरुवात केली, असा आरोपही पतीने केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश