"झोपालायही वेळ मिळत नाही.."; कामाच्या तणावामुळे सॉफ्टवेअर इंजिनिअरनं संपवलं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 10:43 IST2025-04-10T10:42:33+5:302025-04-10T10:43:14+5:30
कोट्टायम इथं शनिवारी घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. जॅकब थॉमस हा कोट्टायमच्या कांजीकुझी भागातील रहिवासी होता.

"झोपालायही वेळ मिळत नाही.."; कामाच्या तणावामुळे सॉफ्टवेअर इंजिनिअरनं संपवलं आयुष्य
केरळच्या कोट्टायम इथं आयटी कंपनीत काम करणाऱ्या २३ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणानं कामाच्या तणावामुळे आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवला. या घटनेची चौकशी सुरू आहे. जॅकब थॉमस असं या मृत युवकाचं नाव असून तो कक्कनाड इथल्या खासगी कंपनीत काम करत होता. आत्महत्येपूर्वी जॅकबने आईला अखेरचा व्हिडिओ कॉल केला ज्यात त्याने कामाचा दबाव असल्याचं बोलला.
कोट्टायम इथं शनिवारी घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. जॅकब थॉमस हा कोट्टायमच्या कांजीकुझी भागातील रहिवासी होता. हा युवक ज्या फ्लॅटमध्ये राहत होता, तिथे त्याने इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या केली. मी कामाचा दबाव सहन करू शकत नाही असं जॅकबने आई वडिलांना सांगितले. शनिवारी त्याने आईला व्हिडिओ मेसेज पाठवला. त्यानंतर त्याने फ्लॅटमधून खाली उडी मारून जीव दिला. हा युवक खाली कोसळून तडफडून मृत्यू पावला. युवकाच्या रुममध्ये एक सुसाईड नोटही सापडली. ज्यात कामाच्या प्रेशरचा उल्लेख केला होता.
कामाच्या दबावामुळे झोपायलाही वेळ मिळत नाही असं त्याने सुसाईड नोटमध्ये म्हटलं होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जॅकब मागील वर्षी डिसेंबर महिन्यात एका खासगी कंपनीत नोकरीला लागला होता. काम सुरू झाल्यानंतर अवघ्या ४ महिन्यातच तरुणाने कामाचा प्रेशर घेऊन आत्महत्या केली आहे. जॅकबनं घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे कुटुंबालाही धक्का बसला आहे. कामाच्या तणावामुळे मुलगा झोपतही नव्हता. कुटुंबाने याबाबत पोलीस तक्रार केली आहे. त्याशिवाय कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे.