I do not want to remain CM - Mamata Banerjee | मुख्यमंत्रीपदावर मी कायम राहू इच्छित नाही - ममता बॅनर्जी

मुख्यमंत्रीपदावर मी कायम राहू इच्छित नाही - ममता बॅनर्जी

कोलकाता : मुख्यमंत्रीपदावर मी कायम राहू इच्छित नाही. माझ्या पक्षाला मी तशी माहिती दिली आहे, असे पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
पक्षाची लोकसभा निवडणुकांमध्ये लक्षणीय पिछेहाट झाली. त्यानंतर प्रथमच आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. निवडणूक आयोग, केंद्रीय सुरक्षा बलासह केंद्र सरकारने आपल्या विरोधात काम केल्याचा आरोप त्यांनी केला. पुढचे ६ महिने मी काम करण्यास असमर्थ आहे, असे मी पक्षाला सांगितले आहे.

Web Title: I do not want to remain CM - Mamata Banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.