शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

माझा भुतकाळ जाणून देशाला माझ्याप्रती सहानुभूती वाटावी अशी माझी इच्छा नाही - मनमोहन सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 22:37 IST

माझा भुतकाळ जाणून देशाला माझ्याप्रती सहानुभूती वाटावी अशी माझी इच्छा नाही. या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कोणतीही स्पर्धा करण्याची माझी इच्छा नाही असा टोला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देमनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला निशाणा 'माझा भुतकाळ जाणून देशाला माझ्याप्रती सहानुभूती वाटावी अशी माझी इच्छा नाही''8 नोव्हेंबर 2016 ही तारीख भारतीय अर्थव्यवस्था आणि लोकशाहीसाठी काळा दिवस'

सुरत - माझा भुतकाळ जाणून देशाला माझ्याप्रती सहानुभूती वाटावी अशी माझी इच्छा नाही. या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कोणतीही स्पर्धा करण्याची माझी इच्छा नाही असा टोला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लगावला आहे.  गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पोहोचलेल्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 8 नोव्हेंबर 2016 ही तारीख भारतीय अर्थव्यवस्था आणि लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचं मनमोहन सिंग यांनी यावेळी म्हटलं. बँकांबाहेर रांगेत उभं राहून मृत्यूमुखी पडलेल्या 100 लोकांच्या मृत्यूचं मला दु:ख असल्याचंही मनमोहन सिंग यांनी यावेळी सांगितलं. 

मनमोहन सिंग यांनी सांगितलं की, '8 नोव्हेंबर हा भारतीय अर्थव्यवस्था तसंच लोकशाहीसाठी काळा दिवस होता. मी पुर्ण दु:ख आणि जबाबदारीने हे बोलत आहेत. रांगेत उभ्या राहून आपला जीव गमावणा-या 100 लोकांच्या मृत्यूमुळे मी व्यथित आहे'. यावेळी मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत म्हटलं की, पंडित जवाहरलाल नेहरु आणि सरदार पटेल यांच्याशी तुलना करुन मोदीजी काहीच मिळवून शकणार नाहीयेत. 

'जुलै सप्टेंबर तिमाहीत जीडीपीत झालेल्या 6.3 टक्के वाढीमुळे देशातील आर्थिक मंदीचं रुपडं पालटलं आहे असं म्हणणं जरा घाईचं होईल. कारण यामध्ये मध्यम आणि छोट्या क्षेत्रातील आकडेवारीचा उल्लेख नाही. ज्यांना नोटाबंदी आणि घाईघाईत लागू कऱण्यात आलेल्या जीएसटीमुळे मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे', असं मनमोहन सिंग म्हणाले आहेत. त्यांनी जुलै-सप्टेंबर तिमाहीत झालेल्या 6.3 टक्के वाढीचं त्यांनी स्वागत केलं, मात्र यासोबत अर्थव्यवस्थेत सुधार झाल्याचा निष्कर्ष काढणं घाईचं होईल अशी चेतावणीही दिली. 

मनमोहन सिंग यांनी नोटाबंदी आणि जीएसटीवरुन मोदी सरकारवर टीका केली. पंतप्रधान नरेद्र मोदी लोकांना प्रभावित करण्यासाठी आणि मतं मिळवण्यासाठी अजून चांगले मार्ग शोधतील असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. 

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदी