शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हार्दिक म्हणाला मी नामर्द नाही, सीडी प्रकरणात भाजपाचे कनेक्शनही आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 12:50 IST

हार्दिक पटेलच्या कथित सीडी प्रकरणामुळे गुजरातचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यातील स्थानिक वृत्तवाहिन्यांवर हा व्हिडीओ प्रसारित झाल्यापासून जोरदार -आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत, दरम्यान, हार्दिक पटेलनेही चारित्र्यहननाच्या या प्रकाराचा सामना करण्याच आपण सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत.

अहमदाबाद - हार्दिक पटेलच्या कथित सीडी प्रकरणामुळे गुजरातचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यातील स्थानिक वृत्तवाहिन्यांवर हा व्हिडीओ प्रसारित झाल्यापासून जोरदार -आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत, दरम्यान, हार्दिक पटेलनेही चारित्र्यहननाच्या या प्रकाराचा सामना करण्याच आपण सज्ज असल्याचे संकेत देताना मी नामर्द नाही, जर व्हिडीओमधील व्यक्ती मी असतो तर थेट समोर आलो असतो, असे म्हटले आहे. दुसरीकडे या सीडी प्रकरणातील भाजपा कनेक्शन समोर आले आहे. ही व्हि़डीओ सीडी प्रसारित करणारा अश्विन सांकडसरिया याची मनसुख मांडविया यांच्यासोबतचे छायाचित्र प्रसारित झाले आहे. आता हे छायाचित्र समोर आल्यानंतर हार्दिक पटेल आणि काँग्रेसकडून भाजपावर होत असलेले हल्ले अधिकाधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.   दरम्यान, या व्हिडिओमागे भाजपचा हात असून गुजरातमध्ये घाणेरडे राजकारण होत असल्याचा आरोप हार्दिक पटेलने केला होता. या व्हिडिओत दिसत असलेली व्यक्ती आपण नसून, मला बदमान केल्यास हरकत नाही, पण या व्हिडिओमधूम गुजरातमधील महिलांना बदनाम करण्यात येत आहे, असा आरोप केला. गुजरातमध्ये  हार्दिक पटेलचा एका महिलेसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेल्या या व्हिडिओमध्ये हार्दिक पटेलसारखा दिसणार तरुण एका महिलेसोबत बंद खोलीत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या तारखेवरून हा व्हिडिओ मे महिन्यात शूट करण्यात आलेला असण्याची शक्यता आहे.  गुजरात विधानसभा निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी भाजपा माझी बनावट सेक्स सीडी जारी करुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकते, असा धक्कादायक आरोप पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलनं काही दिवसांपूर्वी केला होता.  ''मला बदनाम करण्यासाठी भाजपानं माझी बनवाट सेक्स सीडी बनवली आहे. ही सीडी बरोबर निवडणुकीपूर्वी जारी करण्यात येईल. याहून भाजपाकडून आणखी काय अपेक्षा केली जाऊ शकते. म्हणून प्रतीक्षा करा, पाहा आणि आनंद घ्या''. असे त्याने त्यावेळी म्हटले होते.  

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Gujaratगुजरात