शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

ब्राम्हण असल्याने मी चौकीदार होऊ शकत नाही : सुब्रमण्यम स्वामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 18:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच सुरु केलेल्या 'मै भी चौकीदार' मोहिमेमुळे सोशल मिडियावर भाजपा नेत्यांपासून समर्थकांनी आपल्या नावासमोर चौकीदार लिहिण्यास सुरुवात केली.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच सुरु केलेल्या 'मै भी चौकीदार' मोहिमेमुळे सोशल मिडियावर भाजपा नेत्यांपासून समर्थकांनी आपल्या नावासमोर चौकीदार लिहिण्यास सुरुवात केली. मात्र, भाजपाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आपण ब्राम्हण असल्याने नावापुढे चौकीदार केले नसल्याचे वक्तव्य केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 मार्चला मै भी चौकीदार हे घोषवाक्य घेऊन मोहिम सुरु केली होती. केवळ मी एकटाच चौकीदार नाही, भ्रष्टाचाराची लढाई लढणारा, सामाजिक गुन्हेगारीशी लढणारा आणि वाईट प्रवृत्तींवर नजर ठेवणार प्रत्येक भारतीय चौकीदार असल्याचं मोदींनी म्हटले होते. यानंतर देशपातळीवरीलच नव्हे तर राज्य पातळीवरील नेत्यांसह मोदी समर्थकांनी ट्विटर, फेसबुकवर नावापुढे चौकीदार असे नमूद केले आहे. तसेच अनेकांनी आपल्या फोटोवरही  'मै भी चौकीदार' असे लिहीत पोस्ट केले आहेत. 

यावर तामिळणाडूतील एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना नावापुढे चौकीदार का लावले नाही असे विचारण्यात आले. यावर स्वामींनी मी ब्राम्हण आहे. यामुळे मी चौकीदार होऊ शकत नाही. यामुळे नावापुढे चौकीदार लावले नाही. माझ्या सूचनांवर चौकीदारांना काम करावे लागते. असेच चौकीदार ठेवणाऱ्यांना अपेक्षित असते. त्यामुळे मी त्यांच्यातला नाही, असे उत्तर दिले. 

मै भी चौकीदार हूँ, या कॅम्पेनसह भाजपाने 2019 च्या लोकसभा निवडणूक अभियानाला सुरुवात केली आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून नरेंद्र मोदी 31 मार्च रोजी देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. दरम्यान, 11 एप्रिल रोजी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होणार आहे.

 दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चौकीदार ही चोर है, असे म्हणत मोदींवर प्रहार केला होता. मात्र, मोदींनी प्रत्येक भारतीय चौकीदार असल्याचे सांगत पुन्हा एकदा स्वत:च्या चौकीदार या प्रतिमेला स्थानिक पातळीवरील जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे या अभियानाद्वारे केवळ मोदीच नाहीत, तर प्रत्येक भारतीय चौकीदार असल्याचं भाजपाने म्हटलं आहे. 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा