देशासह परदेशातही आपल्या गायनामुळे लोकप्रिय झालेली लोकगायिका मैथिली ठाकूर बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. यासंदर्भात आता खुद्द मैथिलीचे वडील रमेश ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरपली मुलगी राजकारणात उतरली, तर आनंदच होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
जबलपूर येथे मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना रमेश ठाकूर म्हणाले, "जेव्हा बिहारमधून पलायन सुरू झाले, तेव्हा आम्ही पहिल्या बॅचमधील पलायनकर्ते होतो. तेव्हापासून जे बाहेर पडलो, ते अद्यापही बाहेरच आहेत."
जातीय संघर्षामुळे सोडावा लागला बिहार -या पलायनाचे कारण सांगताना ते म्हणाले, राज्यात अचानकच जातीय उन्माद आणि संघर्ष प्रचंड वाढला होता. मी 1995 मध्ये बिहार सोडला आणि गेल्या 30 वर्षांपासून बाहेरच आहे." त्यांनी तत्कालीन परिस्थितीसाठी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांना जबाबदार धरले. "लालू यादव सत्तेत आल्यानंतर वातावरण खूपच बिघडले. ब्राह्मणांवर हल्ले सुरू झाले आणि लोक त्यांच्या शेत-जमिनींवर कब्जा करू लागले. त्याचबरोबर खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रकारही सुरू झाले होते." असेही ते म्हणाले.
यावेळी रमेश ठाकूर यांनी बिहारमधील विद्यमान नेतृत्वाकडून एक महत्त्वाची अपेक्षा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "बिहारमधून जे लोक पलायन करून गेले आहेत, त्यांची दखल घेणारे अजून कुणी नाही. त्यावर थोडे काम व्हायला हवे. जेणेकरून राज्याबाहेर गेलेले लोक पुन्हा बिहारमध्ये परत येऊन येथे काम करू शकतील. 1995 मध्ये सुरू झालेले हे पलायन आजही सुरूच आहे," असेही ते म्हणाले. याशिवाय, एनडीए (NDA) सरकार आल्यापासून बिहारमध्ये काहीसा विकास झाला असून, परिस्थिती सुधारली आहे, असे म्हणत त्यांनी एनडीएचे कौतुकही केले.
Web Summary : Folk singer Maithili Thakur's potential Bihar election bid prompts her father's reaction. He recounts their family's migration from Bihar in 1995 due to caste-based violence under Lalu Yadav's rule and expresses hope for the return of migrants with improved conditions under the NDA government.
Web Summary : लोक गायिका मैथिली ठाकुर के बिहार चुनाव में संभावित उम्मीदवारी पर उनके पिता की प्रतिक्रिया आई है। उन्होंने लालू यादव के शासन में जाति आधारित हिंसा के कारण 1995 में बिहार से अपने परिवार के पलायन को याद किया और एनडीए सरकार के तहत बेहतर परिस्थितियों में प्रवासियों की वापसी की उम्मीद जताई।