शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

"मी तुमचा सल्लागार नाही...!"; राहुल गांधींच्या विधानावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला भडकले; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 17:48 IST

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, "जे पुस्तकच प्रकाशितच झालेले नाही, त्याचा संदर्भ विरोधीपक्ष नेते सभागृहात देऊ शकत नाहीत." मात्र, यानंतरही राहुल गांधी वारंवार जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख करतच होते. दरम्यान गदारोळ एवढा वाढला की...

सध्या संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर, धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचा उल्लेख करत, डोकलाममध्ये चिनी टँकचा उल्लेख केला आणि लोकसभेत एकच गदारोळ सुरू झाला. दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींच्या त्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला. यानंतर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नियम ३४९ चा हवाला देत राहुल गांधींना रोखले. 

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, "जे पुस्तकच प्रकाशितच झालेले नाही, त्याचा संदर्भ विरोधीपक्ष नेते सभागृहात देऊ शकत नाहीत." मात्र, यानंतरही राहुल गांधी वारंवार जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख करतच होते. दरम्यान गदारोळ एवढा वाढला की, राहुल गांधी म्हणाले, "मग आपणच सांगा, मी काय बोलायला हवे?" यावर अध्यक्ष म्हणाले, "मी काही आपला सल्लागार नाही. मूळ विषयावर बोलावे."

"भारत-चीन संबंधांवर बोलण्यापासून कोणता नियम रोखतो?" -दरम्यान, राहुल गांधी म्हणाले, "भारत-चीन संबंधांवर बोलण्यापासून आपल्याला कोणता नियम रोखतो?" यावर अध्यक्ष म्हणाले, सध्याच्या विषयाशी याचा काहीही संबंध नाही. मात्र, यावर राहुल गांधी पुन्हा म्हणाले, आपल्याला म्हणायचे आहे की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा परराष्ट्र धोरनाशी कसलाही संबंध नाही. यावर अध्यक्ष म्हणाले, आपण विषयावर बोलावे. यासंदर्भात आपल्याला अनेक वेळा नियम समजावण्यात आले आहेत.

अखिलेश यादव यांनी राहुल गांधींचे समर्थनार्थ केले -यानंतर, राहुल गांधी यांनी एका मासिकातील लेखाचा उल्लेख करत पुन्हा तोच विषय उपस्थित केला. यानंतर, सत्ताधारी बाकांवरून पुन्हा जोरदार विरोध करण्यात आला. दरम्यान, सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी राहुल गांधींचे समर्थनार्थ केले. "चीनचा मुद्दा संवेदनशील असून एखादा सल्ला देशहिताचा असेल तर विरोधी पक्षनेत्यांना बोलू द्यायला हवे," असे ते म्हणाले. यावर, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, "आम्ही येथे ऐकण्यासाठी बसलो आहोत. मात्र, ते अध्यक्षांच्या आदेशानंतरही पुन्हा तेच वाचत आहेत. सभागृह असे कसे चालू शकते?" यानंतरही सभागृहात बराचवेळ गदारोळ सुरू होता. अखेर सभापतींनी सभागृहाचे कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब केले होते. यानंतर जेव्हा पुन्हा कामकाज सुरू झाले. त्यानंतरही राहुल गांधी त्यांच्या म्हणण्यावर आग्रही होते. यावर पुन्हा गदारोळ होऊन काम काज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Lok Sabha Speaker Birla rebukes Rahul Gandhi over China remarks.

Web Summary : During a parliamentary debate on China, Rahul Gandhi's remarks led to uproar. Speaker Om Birla intervened, citing rules and advising Gandhi to stick to the topic. The session was adjourned amidst the commotion.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीom birlaओम बिर्लाlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा