शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

दलितांच्या घरी जेवायला मी काही श्रीराम नाही- उमा भारती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 10:41 IST

त्यामुळेच मी सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या भोजन समारंभांमध्ये सहभागी होत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार इशारे देऊनही भाजपाचे वाचाळवीर काही शांत बसायला तयार नाहीत. केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यावरून याचा प्रत्यय आला. त्या मंगळवारी छतरपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी म्हटले की, मी कधीच दलितांच्या घरी जेवायला जात नाही. परंतु, यासाठी माझ्याकडे ठोस असे कारण आहे. त्यामुळेच मी वेगळ्या ठिकाणी जेवते किंवा दलित समाजातील लोकांना भोजनासाठी घरी बोलावते. त्यांच्या घरी जाऊन जेवायला मी काही प्रभू रामचंद्र नव्हे. मी घरी जेवायला गेल्याने ते पवित्र होणार नाहीत. किंबहुना दलित लोक जेव्हा आपल्या घरात येऊन जेवतील तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने पवित्र होऊ. त्यामुळेच मी सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या भोजन समारंभांमध्ये सहभागी होत नाही, असे उमा भारती यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपाला पुन्हा विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. काही वेळाने आपण काय बोलून बसलो याची उपरती उमा भारती यांना झाली. या गावात समरसता भोजन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, हे मला माहिती नव्हते. दलित समाजाच्या लोकांच्या घरी जाऊन त्यांना भेटणे, त्यांची विचारपूस करणे त्यांच्या घरी जेवण करणे या सगळ्या गोष्टी आता मागे पडल्या आहेत, असेही मत उमा भारती यांनी नोंदवले. राजकारणातही दलितांसोबत भेदभाव केला जातो तो दूर झाला पाहिजे, दलितांच्या आर्थिक समृद्धीसाठी आणि त्यांना समाजात एक चांगले स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, अशी सारवासारव उमा भारती यांनी करावी लागली.गेल्या काही दिवसांतील घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलित समाजातील पक्षाविषयीची नाराजी दूर करण्याचे आदेश नेत्यांना दिले आहेत. त्यासाठी दलितबहुल गावांमध्ये एका रात्रीसाठी वास्तव्य करा, असे मोदींनी भाजपाच्या नेत्यांना सांगितले आहे.  

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीDalit assaultदलितांना मारहाण