मी हिटलर आहे - तेलंगण सीएम चंद्रशेखर राव

By Admin | Updated: August 18, 2014 12:28 IST2014-08-18T09:01:14+5:302014-08-18T12:28:55+5:30

अन्याय करणारे, चोर, भ्रष्टाचारी यांना रोखण्यासाठी आपण खरच 'हिटलर' आहोत असे विधान तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केले आहे.

I am Hitler - Telangana CM Chandrasekhar Rao | मी हिटलर आहे - तेलंगण सीएम चंद्रशेखर राव

मी हिटलर आहे - तेलंगण सीएम चंद्रशेखर राव

ऑनलाइन लोकमत

हैदराबाद, दि. १८ - तेलंगणमधील जनतेची सामाजिक व आर्थिक स्थितीच्या पाहणीसाठी करण्यात येणा-या सर्वेक्षणावरून वाद सुरू असताना तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी या निर्णयाचे समर्थन करत 'अन्याय' रोखण्यासाठी आपण 'हिटलर' बनू शकतो असे वक्तव्य केले. 
रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. 'कोणी म्हणतात केसीआर हिटलर आहे, कोणी म्हणतं मी हुकूमशहा आहे, मी तर म्हणतो चोर, भ्रष्टाचारी लोकांसाठी मी खरंच हिटलर बनू शकतो. अन्याय  थांबवण्यासाठी हिटलर बनण्यात मला कोणताही कमीपणा वा लाज वाटत नाही', असे सांगत त्यांनी आपल्या निर्णयाचे समर्थनच केले. राज्यातील योग्य व गरजू नागरिकांपर्यंत  सरकारच्या योजना पोहोचव्यात हाच या सर्वेक्षणाचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.

Web Title: I am Hitler - Telangana CM Chandrasekhar Rao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.