Shivraj Singh Chauhan : "मी माजी मुख्यमंत्री आहे, रिजेक्टेड मुख्यमंत्री नाही"; शिवराज सिंह चौहान य़ांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 11:17 AM2024-01-13T11:17:37+5:302024-01-13T11:33:53+5:30

Shivraj Singh Chauhan : शिवराज सिंह चौहान यांनी "मला माजी मुख्यमंत्री म्हटलं जातं, पण हे रिजेक्शन नाही. मुख्यमंत्री पद गेल्यानंतरही मध्य प्रदेशातील लोक खूप प्रेम करतात" असं म्हटलं आहे. 

i am former cm not rejected says madhya pradesh Shivraj Singh Chauhan | Shivraj Singh Chauhan : "मी माजी मुख्यमंत्री आहे, रिजेक्टेड मुख्यमंत्री नाही"; शिवराज सिंह चौहान य़ांनी स्पष्टच सांगितलं

Shivraj Singh Chauhan : "मी माजी मुख्यमंत्री आहे, रिजेक्टेड मुख्यमंत्री नाही"; शिवराज सिंह चौहान य़ांनी स्पष्टच सांगितलं

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या भवितव्याबाबत भाजपाने अद्याप कोणतेही संकेत दिलेले नाहीत. त्यांच्यासाठी पक्ष नेमका काय विचार करत आहे, याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. याच दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांनी "मला माजी मुख्यमंत्री म्हटलं जातं, पण हे रिजेक्शन नाही. मुख्यमंत्री पद गेल्यानंतरही मध्य प्रदेशातील लोक खूप प्रेम करतात" असं म्हटलं आहे. 

पुण्यातील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना माजी मुख्यमंत्री शिवराज म्हणाले की, "मला आता माजी मुख्यमंत्री म्हटलं जातं, परंतु मी रिजेक्टेड मुख्यमंत्री नाही. अनेक वेळा मुख्यमंत्री पद सोडलं जातं कारण लोक जास्त काळ सत्तेत राहिल्यास नावं ठेवतात. पण मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही आता जिथे जातो तिथे लोक मामा म्हणतात. जनतेचे प्रेम हाच माझा खरा खजिना आहे."

"मी कोणत्याही पदासाठी राजकारणात नाही"

भाजपाचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, "मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याचा अर्थ मी सक्रिय राजकारण सोडेन असा होत नाही. मी कोणत्याही पदासाठी राजकारणात नाही, तर जनतेची सेवा करण्यासाठी मी राजकारण करत आहे." 1990 मध्ये बुधनी येथून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकण्यापासून सुरू झालेल्या त्यांच्या निवडणूक कारकिर्दीबद्दल बोलताना, शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या विजयाचे श्रेय प्रामाणिकपणे निवडणूक लढण्याला दिले.

"11 निवडणुका जिंकल्या, कधीही स्वत:साठी प्रचार केला नाही"

अहंकाराची भाषा बोलत नाही, यावर शिवराज सिंह यांनी भर दिला. त्यांनी 11 निवडणुका जिंकल्या आहेत, परंतु त्यांनी कधीही स्वत:साठी प्रचार केला नाही. उमेदवारी दाखल करण्याच्या एक दिवस आधी मी मतदारसंघात जातो, असं सांगून शिवराज सिंह म्हणाले की, निवडणूक प्रामाणिकपणे लढली तर जनता तुमच्यासोबत असेल.

शिवराज सिंह चौहान जवळपास 20 वर्षे सत्तेत होते. त्यानंतरही या निवडणुकीत भाजपाला राज्यातील 230 पैकी 163 जागा मिळाल्या. तीन डिसेंबरला निकाल जाहीर झाल्यानंतर आणि मध्य प्रदेशचा पुढचा मुख्यमंत्री होणार हा नवा चेहरा असल्याची चर्चा असताना शिवराज म्हणाले होते, "इतर भाजपा नेते दिल्लीला जात असताना, मी स्वतःसाठी काही मागण्यासाठी दिल्लीला जाणार नाही. तिथे जाण्यापेक्षा मी मरण पत्करेन."
 

Web Title: i am former cm not rejected says madhya pradesh Shivraj Singh Chauhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.