मी पूर्णपणे बरा झालो आहे - मनोहर पर्रीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:54 IST2018-06-04T00:54:53+5:302018-06-04T00:54:53+5:30

मी पूर्णपणे बरा झालो आहे आणि लवकरात लवकर गोव्यात येण्याचा प्रयत्न करत आहे, अशी आशा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लोकमतच्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांच्याशी अमेरिकेहून बोलताना व्यक्त केली.

 I am completely cured - Manohar Parrikar | मी पूर्णपणे बरा झालो आहे - मनोहर पर्रीकर

मी पूर्णपणे बरा झालो आहे - मनोहर पर्रीकर

पणजी : मी पूर्णपणे बरा झालो आहे आणि लवकरात लवकर गोव्यात येण्याचा प्रयत्न करत आहे, अशी आशा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लोकमतच्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांच्याशी अमेरिकेहून बोलताना व्यक्त केली.
रविवारी रात्री दहा वाजून २० मिनिटांनी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला तेव्हा त्यांचा आवाज नेहमीसारखाच दमदार होता. गोवेकरांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला, प्रेम दिले आणि प्रार्थना केल्या, त्यांचा मी सदैव ऋणी आहे, असे पर्रीकर यांनी सांगितले.
पर्रीकरांवरील उपचाराची अंतिम फेरी गेल्या आठवड्यात पार पडली. १६ जूनला त्यांच्या आरोग्यासंदर्भात आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतरच त्यांनी गोव्यात कधी परतायचे ते ठरवले जाणार आहे.
पर्रीकर स्वत:ही गोव्यात यायला आतुर आहेत, हे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. त्यांनी गोव्यातील लोकांची आस्थेने चौकशी केली. मी काही लोकांशी अजून बोलू शकलो नव्हतो; आता मुद्दाम वेळ काढून लोकांशी संपर्क करेन, असे पर्रीकर म्हणाले.

Web Title:  I am completely cured - Manohar Parrikar