शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
4
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
5
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
7
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
8
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
9
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
10
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
11
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
12
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
13
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
14
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
15
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
16
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
17
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
18
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
19
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
20
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

काँग्रेसच्या अपशब्दांचा मी आभूषण म्हणून स्वीकार करतो; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 05:41 IST

काँग्रेसने मला ९१ वेळा अपमानित केले, काँग्रेसने अपशब्दांच्या शब्दकोशावर वेळ घालवण्यापेक्षा सुशासनावर लक्ष केंद्रित केले असते, तर त्यांची अशी दयनीय अवस्था झाली नसती अशी टीका मोदींनी काँग्रेसवर केली.

हुमनाबाद (कर्नाटक) : काँग्रेस आणि या पक्षाच्या नेत्यांनी मला ९१ वेळा अपमानित केले आहे. काँग्रेसने इतकी मेहनत सुशासनासाठी घेतली असती, तर या पक्षाची अशी वाताहत झाली नसती, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी यांना ‘विषारी साप’ अशी उपमा दिली होती. त्याचा समाचार मोदींनी घेतला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद येथील जाहीर सभेत मोदी यांनी म्हटले की, काँग्रेसने माझ्याबद्दल वापरलेल्या अपशब्दांची यादी कोणी तरी मला पाठवली आहे. काँग्रेसने आतापर्यंत ९१ वेळा माझ्याबद्दल अपशब्द वापरले आहेत. काँग्रेसने अपशब्दांच्या शब्दकोशावर वेळ घालवण्यापेक्षा सुशासनावर लक्ष केंद्रित केले असते, तर त्यांची अशी दयनीय अवस्था झाली नसती.

मोदी यांनी सांगितले की, गेल्या निवडणुकीत काँग्रेसने ‘चौकीदार चोर है’ अभियान चालविले होते. नंतर ते म्हणाले, ‘मोदी चोर है’ नंतर पुन्हा म्हणाले ‘ओबीसी समुदाय चोर है’. आता कर्नाटकात प्रचार सुरू होताच काँग्रेसने माझ्या लिंगायत बंधू-भगिनींना अपमानित केले आहे. मात्र, अपशब्दाला मतांच्या माध्यमातून उत्तर देण्याचा निर्णय कर्नाटकाच्या जनतेने घेतला आहे. मोदी यांनी म्हटले की, काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांंबद्दलही अपशब्द वापरले होते. आपण आजही पाहतो आहोत की, काँग्रेस सावरकरांबद्दलही अपशब्द वापरत आहे. काँग्रेसच्या अपशब्दांचा मी आभूषण म्हणून स्वीकार करतो. 

निवृत्तीच्या नावाने मते मागण्याची वेळकाँग्रेस नेत्यांवर आपल्या निवृत्तीच्या नावे मते मागण्याची वेळ आली आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लगावला आहे. मोदी यांनी सांगितले की, ‘ही माझी शेवटची निवडणूक आहे. मला एक संधी द्या’, असे आवाहन काँग्रेस नेते करीत आहेत. मला माहिती आहे की, अशा थकलेल्या आणि पराभूत काँग्रेसला कर्नाटकचे लोक निवडणार नाहीत. उत्साही भाजपचीच ते निवड करतील. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक