शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

कॅडबरी डेअरी मिल्कमध्ये आढळली जिवंत अळी; ग्राहकाने शेअर केला Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 11:49 IST

Worm in Dairy Milk Chocolate : कॅडबरी डेअरी मिल्कच्या चॉकलेटमध्ये जिवंत अळी आढळल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे.

Worm in Dairy Milk Chocolate : हैदराबाद : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कॅडबरी चॉकलेट आवडते. मात्र, कॅडबरी डेअरी मिल्कच्या चॉकलेटमध्ये जिवंत अळी आढळल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे. तसेच, यासंबंधीचा व्हिडिओ या व्यक्तीने सोशल मीडिया एक्सवर (ट्विटर) शेअर केला आहे. रॉबिन झॅकियस नावाच्या हैदराबादमधील एका व्यक्तीने ही पोस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे, येथील मेट्रो स्टेशनवरील स्टोअरमधून रॉबिन झॅकियस यांनी कॅडबरी चॉकलेट खरेदी केले होते. 

रॉबिन झॅकियस यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "अमीनपेटमधील रत्नदीप मेट्रोमधून खरेदी केलेल्या कॅडबरी चॉकलेटमध्ये एक जिवंत अळी सापडली आहे. या अशा एक्स्पायरी डेट जवळ आलेल्या उत्पादनांची तपासणी करण्यासाठी कुठली यंत्रणा आहे? सार्वजनिक आरोग्याच्या धोक्याबाबत कोण जबाबदार आहे?" असा प्रश्न रॉबिन झॅकियस यांनी उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनुसार, डेअरी मिल्क कॅडबरीच्या अर्धवट फाडलेल्या रॅपरमध्ये कॅडबरीवर वळवळणारी जिवंत अळी दिसत आहे. 

या व्हिडीओसोबत खरेदीचे बिलही पोस्ट करण्यात आले आहे. त्यात ९ फेब्रुवारीला ही कॅडबरी मेट्रो स्टेशनवरील रत्नदीप रिटेल शॉपमधून ४५ रुपयांना खरेदी केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, रॉबिन झॅकियस यांनी केलेली ही पोस्ट व्हायरल झाली असून कॅडबरीच्या गुणवत्तेवर काही युजर्स प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहेत. दरम्यान, यावर रॉबिन झॅकियस यांनी केलेल्या पोस्टवर कॅडबरी डेअरी मिल्क कंपनीकडून रिप्लाय सुद्धा दिला आहे. 

काय म्हटले आहे कंपनीने?कंपनीने म्हटले आहे की, "नमस्कार. मंडेलेज इंडिया फूड प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची कॅडबरी इंडिया लिमिटेड) नेहमीच उत्पादनांचा उच्च दर्जा राखण्यासाठी प्रयत्नशील असते. तुम्हाला आलेल्या वाईट अनुभवासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी कृपया तुमची तक्रार suggestions@mdlzindia.com वर पाठवा. त्यासोबत तुमचे पूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर आणि खरेदीची माहिती द्या", अशी विनंती कंपनीकडून करण्यात आली आहे. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाSocial Viralसोशल व्हायरल