Hyderabad Encounter: ​​​​​​​सज्जनार पोलीस अधीक्षक असतानाही चकमकीत ठार झाले तीन आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 04:18 AM2019-12-07T04:18:58+5:302019-12-07T04:20:02+5:30

या आरोपींनी अचानक हल्ला केल्याने पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात ते तीनही जण ठार झाले.

Hyderabad Encounter: Three accused were killed in a clash while the vc sajjanar was the Superintendent of Police | Hyderabad Encounter: ​​​​​​​सज्जनार पोलीस अधीक्षक असतानाही चकमकीत ठार झाले तीन आरोपी

Hyderabad Encounter: ​​​​​​​सज्जनार पोलीस अधीक्षक असतानाही चकमकीत ठार झाले तीन आरोपी

Next

वरंगळ : सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार पूर्वी वरंगळ जिल्ह्यात पोलीस अधीक्षक दोन मुलींवर अ‍ॅसिड फेकणारे तीन आरोपीही पोलीस चकमकीत अशाच प्रकारे मारले गेले होते. त्यावेळीही आरोपींना तपासासाठी घटनास्थळी नेले असताना आरोपींनी आमच्यावर हल्ला केला आणि आम्ही स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात आरोपी ठार झाले, असेच पोलिसांनी सांगितले होते.

हा प्रकार डिसेंबर २00८ मध्ये घडला होता. त्या प्रकरणात तीन आरोपी होते. अ‍ॅसिड हल्ला प्रकरणातील आरोपींनी वापरलेली मोटारसायकल ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले होते. त्यावेळी आरोपींनाही सोबत नेण्यात आले होते.

या आरोपींनी अचानक हल्ला केल्याने पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात ते तीनही जण ठार झाले. अ‍ॅसिड हल्ल्यात गंभीररीत्या भाजलेल्या दोघींपैकी एक मुलगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मरण पावली होती. त्या घटनेनंतरही अनेकांनी व्ही. सी. सज्जनार यांचे कौतुक केले होते. गुन्हेगारांचा कर्दनकाळ असेच त्यांचे वर्णन केले गेले होते. मात्र त्या चकमकींविषयीही अनेकांनी शंका व्यक्त केली होती. आताही त्याचप्रकारे चकमक झाली, त्यामुळे अनेकांना वरंगळमधील घटनेची आठवण होत आहे. आताही हैदराबाद वा तेलंगणा राज्यच नव्हे, तर देशभरात त्यांचे कौतुक केले जात आहे.

खूपच साधर्म्य
वरंगळमधील ती घटना व हैदराबादमधील शुक्रवारची चकमक यांच्यात खूपच साधर्म्य असल्याचे दिसत आहे. वरंगळ शहरातील एक व्यावसायिक अमरनाथ यांनी सांगितले की, २००८ साली अ‍ॅसिड हल्ला झालेल्या मुलींबद्दल आम्हाला हळहळ वाटत होती. त्या प्रकरणातील तीन आरोपी चकमकीत मारले गेल्याने आम्हाला दिलासाही मिळाला होता. आता पशुवैद्यकीय तरुणीवर झालेल्या बलात्कारातील चार आरोपीही याच प्रकारे चकमकीत मारले गेले आहेत. या विद्यार्थीनीच्या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे, असेच आम्हाला वाटत आहे.

Web Title: Hyderabad Encounter: Three accused were killed in a clash while the vc sajjanar was the Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.