शहरं
Join us  
Trending Stories
1
'हो, मी पुतीन यांच्यावर खूपच नाराज आहे, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांची रोखठोक भूमिका, काय सांगितले?
2
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
3
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
4
Stock Market Today: ३६ अंकांनी घसरुन सेन्सेक्स उघडला; मेटल क्षेत्रात घसरण, IT मध्ये तेजी; HDFC-Infosys सह 'यात' तेजी
5
२० गुप्त तळघरे, दुबईच्या मौलानाकडून ट्रेनिंग, पुस्तकातून पसरवला द्वेष! छांगुर बाबाचा नेमका प्लान काय होता? 
6
एक स्कीम मुलीसाठी, दुसरी सर्वांसाठी; पाहा तुमच्या गरजेनुसार NPS वात्सल्य-सुकन्यापैकी कोणती आहे बेस्ट?
7
उत्तेजक व्हिडिओ अन् अश्लील भाषा वापरून कमवायचे दरमहिना ३५ हजार; पोलीस तपासात केले कबूल 
8
पोलीस ठाण्यात काम करता करता होमगार्डसोबत पळून गेली तीन मुलांची आई! पोलिसांत धाव घेत पती म्हणाला... 
9
नर्स निमिषा प्रियाचा जीव वाचवला जाऊ शकतो! जिथे सरकारनेही आशा सोडली, तिथे 'या' व्यक्तीने सांगितला मार्ग
10
चालकांत रंगला भाड्यावरून वाद, मृतदेह ३ तास शवागारात; तेलंगणातील बांधकाम मजुराचे मृत्युनंतरही हाल
11
लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
12
Russian Woman : गुहेत सापडलेल्या रशियन महिलेचे गुढ उकलले; एका व्यावसायिकाच्या होती प्रेमात, मुलांचे वडील सापडले
13
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
14
संतापजनक! प्राध्यापक व्हिडिओसह ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार करत होता; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
15
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
16
"माझी इच्छा नव्हती पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं"; सोलापूरातील तरुणाने चिठ्ठी लिहून आयुष्य संपवलं
17
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
18
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
19
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
20
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन

काश्मीरच्या खोऱ्यात लपलेत 'हायब्रिड दहशतवादी', शोपियानमधून दोघांना अटक, एके-५६ सहित दारुगोळा जप्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 12:38 IST

अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी आता काश्मीर खोऱ्यातील सर्च ऑपरेशन आणखी तीव्र केले आहे. या दरम्यान सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळत आहे. बुधवारी रात्री एका सर्च ऑपरेशन दरम्यान सुरक्षा दलाने शोपियानमधून दोन हायब्रिड दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या संघटनेशी संबंधित आहेत. इरफान बशीर आणि उजैर सलाम अशी या दोघांची नावे असून, त्यांच्याकडून प्रचंड दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. 

पोलिसांनी बुधवारी रात्री शोपियानच्या बस्कुचन भागात सर्च ऑपरेशन सुरू केले होते. या ठिकाणी दहशतवादी लपून बसल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. यानंतर त्यांनी एक रणनिती आखून या परिसराला चारही बाजूंनी वेढा दिला आणि पोलिसांची कुमक पाहून दोन्ही दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले. 

हत्यारे आणि दारुगोळा जप्त!

अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. दोघांकडे दोन एके-५६, ४ मॅगजिन, १०२ राऊंड गोळ्या, २ हँड ग्रेनेड आणि २ पाउच इतका मोठा साठा त्यांच्याकडे सापडला. 

अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, "सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे आणि योग्य कारवाईमुळे चकमक टळली आणि दोन्ही हायब्रिड दहशतवाद्यांना जिवंत ताब्यात घेत आले." पोलिसानी या दोन्ही दहशतवाद्यांविरोधात एफआयआर दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे. काश्मीरच्या खोऱ्यातील दहशतवाद संपवण्याच्या दिशेने सैन्याची जोरदार कारवाई सुरू झाली आहे. 

हायब्रिड दहशतवादी कोण आहेत?हायब्रिड दहशतवादी म्हणजे असे लोक ज्यांची नावे कोणत्याही दहशतवादी वॉन्टेड यादीत नसतात. मात्र, हे लोक इतके कट्टरपंथी असतात की, कोणत्याही वेळी दहशतवादी कारवाया करून पुन्हा आपल्या सामान्य जीवनाची सुरुवात करतात. अशा दहशतवाद्यांना ओळखणे कठीण  असते.     

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerrorismदहशतवाद