शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

पतीचे अनैतिक संबंध म्हणजे छळ नाही - सुप्रीम कोर्ट

By admin | Updated: February 19, 2015 10:56 IST

पतीचे दुस-या महिलेशी असलेले अनैतिक संबंध हा त्याच्या पत्नीचा छळ ठरु शकत नाही असे मत सुप्रीम कोर्टाने मांडले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १९ -  पतीचे दुस-या महिलेशी असलेले अनैतिक संबंध हे त्याच्या पत्नीसाठी मानसिक छळ ठरु शकत नाही असे मत सुप्रीम कोर्टाने मांडले आहे. पतीचे अनैतिक संबंध हे पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचे कारण ठरु शकत नाही असा महत्त्वपूर्ण निकालही सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 

गुजरातमधील एका प्रकरणाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने हे मत मांडले. गुजरातमध्ये राहणा-या संबंधीत दाम्पत्त्यामधील संबंध ताणले गेले होते. पतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. यावरुन त्याचा पत्नीशी वाद व्हायचा. या दाम्पत्त्याने घटस्फोट घेण्याचा विचारही केला होता. मात्र त्याची पत्नी निराश झाली व तिने नैराश्याच्या भरात आत्महत्या केली. याप्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी कनिष्ठ न्यायालय व हायकोर्टानेही महिलेच्या पतीला दोषी ठरवले होते. 

हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात आरोपी पतीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाचे न्या. एस.जे. मुखोपाध्याय व दिपक मिश्रा यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी झाली. खंडपीठाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यावर आपला निकाल दिला. 'पतीचे अनैतिक संंबंध असल्याने त्याची पत्नी निराश होती. यातूनच तिने आत्महत्या केली.मात्र यामुळे आरोपी आयपीसीतील कलम ४९८ (अ) अंतर्गत दोषी ठरु शकत नाही असे कोर्टाने स्पष्ट केले. अनैतिक संबंधांचे काही पुरावे आहेत व ते सिद्ध झाले तरी याचिकाकर्ता कलम ४९८ अ अंतर्गत मानसिक छळ केल्याप्रकरणी दोषी ठरु शकत नाही असे कोर्टाने म्हटले आहे.