शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

अतूट प्रेम! पतीच्या मृत्यूनंतर 5 तासांत पत्नीनेही सोडला जीव; एकाच चितेवर दोघांना मुखाग्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 10:27 IST

एका जोडप्याने तब्बल 80 वर्षे एकमेकांना साथ दिली आणि आता सोबतच शेवटचा श्वास घेतला असल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली - प्रेमात अनेकजण एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतात. पण फार कमी लोक ते शेवटपर्यंत निभावू शकतात. अशीच एक हृदयस्पर्शी घटना आता समोर आली आहे. एका जोडप्याने तब्बल 80 वर्षे एकमेकांना साथ दिली आणि आता सोबतच शेवटचा श्वास घेतला असल्याची घटना घडली आहे. पतीच्या मृत्यूनंतर 5 तासांत पत्नीनेही जीव सोडला. त्यामुळे एकाच चितेवर दोघांना मुखाग्नी देण्यात आला आहे. 105 वर्षांचा पती आणि 101 वर्षांची पत्नी ही जोडी प्रेमाचं एक अनोखं उदाहरण ठरली. लग्नानंतर हे जोडपं 80 ​​वर्षे एकत्र राहिलं. अवघ्या पाच तासांच्या अंतराने दोघांचाही मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या अजमेर शहरातील श्रीनगर गावातील या जोडप्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. भैरू सिंह रावत आणि त्यांची पत्नी हिरादेवी असं या जोडप्याचं नाव होतं. रावत यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचं 80 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. दोघांनाही एकमेकांबद्दल खूप जिव्हाळा होता. हे जो़डपं त्यांचा 70 वर्षीय मुलगा शंकरसोबत राहत होते. तीन दिवसांपूर्वी दोघांनी एकत्रच जगाचा निरोप घेतला.

गावकऱ्यांनी या दोघांनीही आपलं जीवन अत्यंत साधेपणानं जगल्याचं सांगितलं. दोघंही एकत्र शेती करायचे. भैरू सिंह यांनी शेतीच्या कामानंतर गावातच किराणा मालाचं दुकान सुरू केलं. काही वर्षांपूर्वी भैरू सिंह यांना अर्धांगवायू झाला होता. भैरू सिंह यांचं दुपारी अचानक निधन झालं. पतीच्या निधनाचा धक्का पत्नी हिरादेवी यांना सहन न झालं नाही. पती भैरू सिंह यांच्या निधनानंतर अवघ्या पाच तासांत हिरादेवी यांनीही जगाचा निरोप घेतला.

एकाच दिवशी एका वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. ग्रामस्थांनी त्यांच्या घरी जाऊन दोघांनाही श्रद्धांजली वाहिली. मृत्यूनंतर दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच चितेवर दोघांचे अंत्यसंस्कार पाहून स्मशानभूमीतील सर्वांचेच लोकांचे डोळे पाणावले. अंत्ययात्रेत आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्नDeathमृत्यूRajasthanराजस्थान