शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

साहेब.. पत्नी विडी ओढते, घटस्फोट मिळवून द्या; पती थेट पोहोचला पोलिसांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 09:06 IST

पत्नीनं दिलेलं कारण ऐकून सर्वजण पडले अवाक्.

बुलंदशहरातील जहांगीराबाद येथे एक अजब घटना समोर आली आहे. "माझी पत्नी विडी ओढते. यामुळे मला अॅलर्जी होते. अनेकदा समजावूनही तिनं मानलं नाही. मला घटस्फोट मिळवून द्या," अशी मागणी एका व्यक्तीनं पोलिसांकडे केली आहे. यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीच्या पत्नीला बोलावून घेतलं. दरम्यान, पत्नीनं दिलेलं कारण ऐकून सर्वच जण अवाक् झाले. आपण टेन्शनमध्ये असलो तर विडी ओढतो, असं कारण तिनं पोलिसांना दिलं. परंतु आपलं लग्न वाचवण्यासाठी भविष्यात विडी ओढणार नाही, असं आश्वासनही तिनं यावेळी दिलं.

जहांगीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक व्यक्ती आठवडाभरापूर्वी एसएसपी स्थित महिला सेल कार्यालयात पोहोचला. या ठिकाणी त्या व्यक्तीनं महिला सेल प्रभारींना तक्रारीचं पत्र दिलं. तसंच आपली पत्नी विडी ओढत असल्याचंही सांगितलं. ती विडी ओढण्यामुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत आहे. यासंदर्भात तिला अनेकदा समजावलं. परंतु तिनं आपली सवय ती सोडत नाही, असं त्यानं पत्रात नमूद केलंय.

माहेरीही केली तक्रारत्या माहेरीही यासंदर्भात तक्रार केली. परंतु त्यांनी समजावल्यानंतरही पत्नी मानत नाही. तिच्या मित्रांनी कुटुंबीयांनीही तिला यासंदर्भात समजावलं असल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर संबंधित महिलेला पोलिसांनी बोलावलं. पोलिसांनी तिला कारण विचारल्यानंतर आपण जेव्हाही कोणत्याही प्रकारच्या तणावात असतो तेव्हा आपण विडी ओढत असल्याचं स्पष्टीकरण दिलं. परंतु पोलिसांनी यानंतर पती पत्नीला समजावून घरी पाठवून दिलं. 

टॅग्स :PoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश