जुगारात पत्नीला लावलं पणाला अन् जिंकल्यानंतर मित्रांनी केला सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 14:37 IST2019-08-02T14:37:39+5:302019-08-02T14:37:45+5:30

उत्तर प्रदेशमधल्या जौनपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

husband punched wife in gambling, friends were gang raped | जुगारात पत्नीला लावलं पणाला अन् जिंकल्यानंतर मित्रांनी केला सामूहिक बलात्कार

जुगारात पत्नीला लावलं पणाला अन् जिंकल्यानंतर मित्रांनी केला सामूहिक बलात्कार

लखनऊः उत्तर प्रदेशमधल्या जौनपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यसनाधीन पतीनं स्वतःच्या पत्नीलाच जुगारात पणाला लावलं आहे. पती आपल्या मित्रांबरोबर जुगार खेळत होता, जुगारात तो पैसे हारला. त्यानंतर त्यानं थेट पत्नीलाच जुगारात लावलं अन् तो हरला. पत्नीला जुगारात हरल्यानंतर त्याच्या मित्रांनी तिच्यावर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पीडितेनं जेव्हा न्यायालयात दाद मागितली, त्यानंतर त्या आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. 

जौनपुर जिल्ह्यात  एक व्यक्तीला दारूचे आणि जुगराचे व्यसन होते. त्याचे दोन्ही मित्र त्याच्या घरीच येऊन मद्यपान करायचे आणि जुगार खेळायचे. एके दिवशी पती सर्व पैसे जुगारात हरला. तेव्हा त्याने जुगारात आपल्या पत्नीलाच पणाला लावले. त्यानंतर पती हरला तेव्हा पतीच्या दोन साथीदारांनी पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. न्यायालयानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला आहे. तसेच एफआयआरची कॉपी न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

Web Title: husband punched wife in gambling, friends were gang raped