पती पोलिस, पत्नी चमकायला गेली! अहो ऐका ना म्हणत, वाहतूक रोखून रील बनविली, मग काय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 18:05 IST2025-03-31T18:05:00+5:302025-03-31T18:05:23+5:30
Viral Video: वाहतूक रोखून रील बनविण्याचा लाड पुरविणे या पोलिसाला महागात पडला आहे. हा व्हिडीओ २३ मार्चचा असला तरी तो आता व्हायरल झाल्याने पोलिसांना कारवाई करणे भाग पडले आहे.

पती पोलिस, पत्नी चमकायला गेली! अहो ऐका ना म्हणत, वाहतूक रोखून रील बनविली, मग काय...
रील बनविण्यासाठी काय काय उद्योग केले जातात हे आपण पाहत असतो. अश्लिल हावभाव, एखाद्याची टेर खेचणे किंवा जिवघेणे स्टंट करणे असे अनेक उद्योग हे स्वत:ला सोशल मीडिया स्टार म्हणविणारे लोक करत असतात. एका महिलेने पती पोलिसात असलेल्याचा फायदा उठवत रस्त्यावरील वाहतूक थांबवत रील काढल्याचा प्रकार समोर आला आहे.
वाहतूक रोखून रील बनविण्याचा लाड पुरविणे या पोलिसाला महागात पडला आहे. हा व्हिडीओ २३ मार्चचा असला तरी तो आता व्हायरल झाल्याने पोलिसांना कारवाई करणे भाग पडले आहे. पोलीस कॉन्स्टेबल अजय कुंडू याला निलंबित करण्यात आले आहे. तसेच अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात रिलस्टार पत्नीचेही नाव आहे.
चंदीगढच्या सेक्टर २० मध्ये ही रील बनविण्यात आली आहे. ज्योती कुंडूने तिची जाऊबाईला सोबत घेऊन पतीच्या मदतीने झेब्रा क्रॉसिंगवर डान्स केला होता. त्याचा व्हिडीओ बनवत रील तयार केली होती. तिने तो व्हिडीओ तिचा पती अजय कुंडूच्याच खात्यावरून अपलोड केला.
पोलिसाच्या बायकोला ही स्पेशल ट्रीटमेंट पाहून नेटकरी पोलिसांना टॅग करू लागले. यामुळे अखेर आपल्या पोलीस कॉन्स्टेबलवर कारवाई करावी लागली. हा पोलीस सेक्टर १९ च्या पोलीस ठाण्यात कार्यरत होता. चंदीगड पोलिसांनी अजय कुंडूला निलंबित केले आणि त्याच्याविरुद्ध सेक्टर-३४ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच व्हिडीओ बनविणाऱ्या ज्योती आणि तिची जाऊ पूजा या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.