शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रागाच्या भरात पत्नीचा गळा आवळला; तिच्या मृतदेहाशेजारी तो रात्रभर बसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 13:44 IST

स्वत:च पोलीस स्टेशन गाठून दिली खुनाची माहिती

दिल्ली: मध्य दिल्लीच्या कमला मार्केट परिसरात एका पतीनं त्याच्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पती तब्बल 24 तास पत्नीच्या मृतदेहाशेजारीच बसून होता. यानंतर त्यानं पोलीस स्टेशन गाठलं आणि गुन्ह्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.कमला मार्केट परिसरात राहणाऱ्या कामिलचं शुक्रवारी त्याची पत्नी रेश्माशी भांडण झालं. यानंतर कामिलनं रेश्माची गळा आवळून हत्या केली. तो रात्रभर रेश्माच्या मृतदेहाशेजारी बसून होता. या दरम्यान त्यानं तिचा मृतदेह पुरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अपयशी ठरल्यावर तो मृतदेहाजवळच बसून राहिला. आपल्या घरात सर्व काही ठिक आहे, हे दाखवण्यासाठी तो शनिवारी पत्नीच्या माहेरीदेखील जाऊन आला. जवळपास 24 तास पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून आलेला कामिल त्यानंतर कमला मार्केट पोलीस स्टेशनला गेला. तिथे त्यानं पोलिसांना या घटनेची माहिती दिली. शुक्रवारी कामिलचं पत्नी रेश्माशी भांडण झालं. त्यानं रागाच्या भरात तिला मारहाण केली. त्यानंतर त्यानं गळा आवळून रेश्माची हत्या केली, अशी माहिती डीसीपी एम. एस. रंधावा यांनी दिली. 'कामिल त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत होता. रेश्माच्या दोन मित्रांविषयी त्याच्या मनात संशय होता. याबद्दल चौकशी करत त्यानं तिला मारहाण केली. त्यानंतर त्यानं 2 वर्षांच्या मुलासमोरच रेश्माची हत्या केली. तो रात्रभर मुलासोबत रेश्माच्या मृतदेहाशेजारी बसला होता,' अशी माहिती रंधावा यांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनdelhiदिल्लीPoliceपोलिस