शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

नवा ट्विस्ट... पाकिस्तानात गेलेल्या अंजू आणि नसरुल्लाविरुद्ध पती अरविंदनं केला एफआयआर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 13:48 IST

पती आणि दोन मुलांना सोडून पाकिस्तानात गेलेल्या अलवरच्या अंजूच्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे.

फेसबुकवर झालेल्या प्रेमापोटी पती आणि दोन मुलांना सोडून पाकिस्तानात गेलेल्या अलवरच्या अंजूच्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. अंजूचा पती अरविंद यानं पत्नी अंजू आणि तिचा पाकिस्तानी प्रियकर नसरुल्लाह यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

अलवरच्या भिवाडी येथील रहिवासी असलेल्या अंजूनं पाकिस्तानात जाऊन तिचा प्रियकर नसरुल्ला याच्याशी लग्न केल्याप्रकरणी अंजूचा पती अरविंद यानं शुक्रवारी रात्री उशिरा भिवडीतील फूलबाग पोलीस ठाण्यात अंजू आणि नसरुल्लाविरुद्ध फिर्याद दिली. अरविंदच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई करत आयपीसी कलम ३६६, ४९४, ५००, ५०६ आणि आयटी अॅक्ट ४७/६६ अन्वये गुन्हा दाखल केलाय. याप्रकरणी भिवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अंजू पोहोचली पाकिस्तानातकुटुंबीयांशी खोटं बोलून अंजू तिच्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेली. अंजू विवाहित असून तिला दोन मुलं आहेत. तिनं इस्लाम धर्म स्वीकारला असून आता फातिमा असं नवीन नाव असल्याचा दावा पाकिस्तानी मीडियानं केलाय. तसंच ती ज्या फेसबुक फ्रेंडला भेटायला आली होती त्याच्याशी निकाह केल्याचंही म्हटलं जातंय. अंजू आणि नसरुल्लाह हे सध्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अपर दीर ​​भागात आहेत.

एका महिन्याचा व्हिसाअंजू २० जुलै रोजी एका महिन्याचा व्हिसा घेऊन पाकिस्तानला गेली, या व्हिसाची अंतिम मुदत २० ऑगस्ट आहे. अंजू २० ऑगस्टपर्यंत पाकिस्तानातून भारतात येते की नाही, हे येणारा काळच सांगेल. मात्र आता अंजूच्या पती आणि मुलांनी अंजूसोबत कोणतेही संबंध ठेवण्यास नकार दिला आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानFacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिस