शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! शाळेतलं प्रेम, लव्ह मॅरेज... कपलने उचललं टोकाचं पाऊल; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 09:10 IST

हरीश बगेश आणि संचिता श्रीवास्तव हे दोघेही वाराणसीतील एकाच शाळेत शिकले होते. ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केलं.

उत्तर प्रदेशमध्ये एका कपलने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाटणाचा रहिवासी हरीश आणि गोरखपूरची रहिवासी संचिता शाळेत असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडले होते नंतर दोघांनी लग्न केलं. मात्र, लग्नानंतर काही वर्षांनी हरीशने वाराणसीत गळफास लावून आत्महत्या केली. पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने संचिताने देखील वडिलांच्या घरी छतावरून उडी मारून आत्महत्या केली.

कपलच्या आत्महत्येनंतर दोन्ही कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश बगेश आणि संचिता श्रीवास्तव हे दोघेही वाराणसीतील एकाच शाळेत शिकले होते. अकरावीत ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केलं. यानंतर हे कपल मुंबईत राहू लागलं. हरीशने एमबीए केल्यानंतर खासगी बँकेत नोकरी केली.

काही दिवसांनी जेव्हा संचिता श्रीवास्तवची तब्येत बिघडली तेव्हा तिचे वडील आणि गोरखपूरचे प्रसिद्ध डॉक्टर रामचरण दास तिला आपल्या शहरात घेऊन गेले. संचितावर गोरखपूरमध्येच उपचार सुरू होते. पत्नीची काळजी घेण्यासाठी हरीशही बँकेची नोकरी सोडून गोरखपूरला आला आणि गेल्या अनेक महिन्यांपासून सासरच्या घरी राहून पत्नीची काळजी घेत होता.

रिपोर्टनुसार, या काळात हरीशने अनेक ठिकाणी नोकरी शोधली, पण निराशा झाली. त्याला कुठेही नोकरी मिळाली नाही. यानंतर दोन दिवसांपूर्वी हरीश पाटणा येथील आपल्या घरी जात असल्याचं सांगून सासरच्या घरातून निघून गेला, मात्र तो वाराणसीला गेला. कुटुंबीयांचा फोन न उचलल्यानंतर, कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला आणि वाराणसीतील सारनाथ भागात पोहोचले, जिथे हरीश होम स्टेच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला.

हरीशचे सासरे आणि गोरखपूर येथील डॉ. रामचरण दास यांना याबाबत माहिती मिळताच ते वाराणसीला रवाना झाले. मात्र, पतीचा मृत्यू झाल्याची माहिती मुलीला समजताच तिला ते सहन न झाल्याने तिने छतावर जाऊन खाली उडी मारली. यामध्ये तिचाही मृत्यू झाला.

सारनाथमध्ये पोलिसांनी आधार कार्डवरून हरीशच्या मृतदेहाची ओळख पटवली. त्याच्या वडिलांचं नाव रामास्वामी मालवीय आहे. पोलिसांनी हरीशचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. मात्र, घटनास्थळावर कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. नोकरी गेल्यानंतर हरीश नैराश्यात राहू लागला आणि त्याला ड्रग्जचं व्यसन लागलं, असं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

टॅग्स :marriageलग्न