स्टाफ बदलण्याची घाई केली
By Admin | Updated: August 23, 2014 12:13 IST2014-08-23T00:56:08+5:302014-08-23T12:13:16+5:30
भारताचा इंग्लंड दौरा संपल्यानंतरही सहयोगी स्टाफमध्ये बदल करणो पसंत केले असते, असे मत भारताचा दिग्गज फलंदाज व माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले आहे.

स्टाफ बदलण्याची घाई केली
नवी दिल्ली : भारताचा इंग्लंड दौरा संपल्यानंतरही सहयोगी स्टाफमध्ये बदल करणो पसंत केले असते, असे मत भारताचा दिग्गज फलंदाज व माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले आहे. तो म्हणाला, अशाप्रकारचे निर्णय संबंधित व्यक्तींसाठी कठीण असतात.
रवी शास्त्री यांची संघ संचालकपदी निवड झाल्यानंतर द्रविडने प्रथमच प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, जर लोक बदलाची मागणी करीत असतील तर तुम्हाला अडचणी येत नाहीत. हा खेळाचा भाग आहे; पण ही नियुक्ती कायम स्वरूपाची आहे किंवा केवळ मालिकेपुरती मर्यादित आहे. हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे थोडी भ्रमाची स्थिती आहे. मालिकेदरम्यान अशा प्रकारच्या नियुक्त्या संबंधित व्यक्तीसाठीही मोठय़ा आव्हानात्मक असतात. एका खेळाडूच्या दृष्टीने हे निर्णय कधी कधी कठीण असतात; पण मला विश्वास आहे की, रवी शास्त्री ही जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळतील. सहयोगी स्टाफचे खेळाडूंसोबत चांगले संबंध जुळतात. वास्तविक, खेळाडू म्हणून आपणही समजू शकतो की, आपल्या यशास आणि पराभवास खेळाडूच जबाबदार असतो.
शास्त्री यांच्या संचालकपदी निवडीनंतर प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्या भविष्याबाबत शंका उपस्थित होत आहेत. यावर द्रविड म्हणाला, हा निर्णय त्यांनाच घ्यावा लागेल की, ते आता नव्या वातावरणात आपली भूमिका कायम कशी ठेवतील; कारण मैदानावर त्यांना आपला रिपोर्ट एका अन्य व्यक्तीकडे सोपवायचा आहे. ङिाम्बाब्बेचे माजी कर्णधार असलेले फ्लेचर यांचे खेळाडूंसोबत चांगले संबंध आहेत, हे सुद्धा द्रविडने स्पष्ट केले. शास्त्री-फ्लेचर हे दोघेही संघाच्या फायद्यासाठी काम करतील, असाही विश्वास त्याने व्यक्त केला. (वृत्तसंस्था)
द्रविडला मार्गदर्शक नेमण्याचा विचार
च्फलंदाजीचा सल्लागार म्हणून सध्या भारतीय संघासोबत इंग्लंड दौ:यावर असलेला भारताचा माजी कसोटीपटू राहुल द्रविड याला संघाचा मेंटर म्हणून नेमण्याच्या विचारात बीसीसीआय असल्याचे समजते आहे.
च्बीसीसीआयच्या सूत्रने दिलेल्या विश्वसनीय माहितीनुसार, प्रशिक्षक डंकन फ्लेचर इंग्लंड दौ:यानंतर राजीनामा देतील, अशी अपेक्षा आहे. खरे तर संघाचा संचालक म्हणून शास्त्रीपेक्षा द्रविडलाच सर्वाची पसंती होती; पण काही कारणास्तव शास्त्रींचे नाव पुढे सरकले.
अनुष्काला बीसीसीआयकडूनच परवानगी
च्भारतीय संघाचा उपकर्णधार विराट कोहलीला त्याची प्रेमिका आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला इंग्लंड दौ:यावर बरोबर घेऊन जाण्यास संघ व्यवस्थापक सुनील देव यांनी विरोध केला होता. पण, बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांच्याकडूनच विराटने परवानगी मिळविली असल्यामुळे देव यांचा नाईलाज झाला. हे दोघे लवकरच लग्न करणार आहेत, त्यामुळे त्यांना परवानगी देण्यात आल्याचे स्पष्टीकरण बीसीसीआयकडून देण्यात आले होते.
च्अनुष्का विराटबरोबर तिस:या कसोटीर्पयत होती. या प्रकरणाचा इतका गवगवा होणार नाही, विराट हे प्रकरण शिताफीने हाताळेल आणि मिडीयाला याची खबर लागू देणार नाही, अशी बीसीसीआयची अपेक्षा होती, पण कसोटी मालिकेत विराटची कामगिरी खराब झाल्यानंतर या प्रकरणाचा बोलबाला झाला. या प्रकरणात हात पोळलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही खेळाडूंना प्रेमिकांसोबत दौ:यावर घेऊन जाण्यास बंदी घातली.
ही भारतीय संस्कृती नाही : मला अनुष्काच्या उपस्थितीवर आक्षेप होता; परंतु मी काहीही करू शकलो नाही. बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी विराटबरोबर अनुष्काला राहण्याची परवानगी दिली हे नंतर आपल्याला माहीत झाले; परंतु सचिवांनी परवानगी देण्याआधी बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष शिवलाल यादव यांची परवानगी घेतली किंवा नाही याविषयी मला शंका होती. त्यांनी याला परवानगी दिली नसेल यावर माझा विश्वास आहे. परदेशी खेळाडू दौ:यावर त्यांच्या प्रेमिकांना घेऊन जातात; परंतु भारतीय संस्कृती वेगळी आहे. भारतीय संस्कृती अशा प्रकारच्या दौ:यावर प्रेमिकांना बरोबर घेऊन जाण्याची परवानगी देत नाही, असे संघ व्यवस्थापक सुनील देव यांनी सांगितले.
धोनी कसोटीसाठी उत्तम कर्णधार : फ्लेमिंग
मुंबई : इंग्लंडमध्ये मानहानीकारक पराभव पत्करणा:या भारतीय संघाच्या कर्णधार महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वावर शंका व्यक्त करण्यात येत असली तरी न्युझीलंडचा माजी कर्णधार स्टिफन फ्लेमिंग याने धोनी हा कसोटीसाठी उत्तम कर्णधार असल्याचे मत व्यक्त केले. फ्लेमिंग हा चेन्नई सुपर किंग्जचा प्रशिक्षक आहे. तो म्हणाला, कर्णधार म्हणून धोनी सक्षम आहे.