शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

ओडिसा आणि आंध्र प्रदेशात धडकणार 'गुलाब' चक्रीवादळ, मुसळधार पावसासह भूस्खलनाचा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 10:25 AM

Cyclone Gulab: चक्रीवादळामुळे उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिसा किनारपट्टीवर 'ऑरेंज' अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विशाखापट्टनम: आज आज ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात 'गुलाब' चक्रीवादळ धडकणार आहे. भारतीय हवामान विभागा (IMD) च्या मते, हे चक्रीवादळ रविवारी सायंकाळी आंध्र प्रदेशातील गोपालपूर आणि कलिंगपट्टणममध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं सांगितल्यानुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या खोल दाबाच्या पट्ट्याचे शनिवारी 'गुलाब' चक्रीवादळात रुपांतर झाले. या चक्रीवादळामुळे उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशा किनारपट्टीवर 'ऑरेंज' अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांनीही चक्रीवादळाचा इशारा आणि हवामान खात्याचा अहवाल लक्षात घेऊन आढावा बैठक घेतली. यात त्यांनी अधिकाऱ्यांना सर्व आवश्यक पऊले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. चक्रीवादळासाठी आंध्रात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच, आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना श्रीकाकुलम आणि विशाखापट्टणम जिल्ह्यात तैनात करण्यात आलं आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात २७-२९ सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता

सध्या गुलाब चक्रीवादळ कुठं आहे ?IMD ने दिलेलया माहितीनुसार, पाकिस्तानने या चक्रीवादळाला 'गुलाब' नाव दिलं आहे. हे चक्रीवादळ सध्या ओडिशामधील गोपालपूरपासून 370 किमी दक्षिणपूर्व आणि आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणमपासून 440 किमी पूर्वेला होतं. हे गेल्या सहा तासात 7 किमी प्रतितास वेगाने पश्चिमेकडे सरकत आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले, हे वादळ पश्चिमेकडे सरकण्याची आणि आज कलिंगपट्टणम आणि गोपालपूर दरम्यान उत्तर आंध्र प्रदेश-दक्षिण ओडिशा किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसाची शक्यतामहापात्रा पुढं म्हणाले की, वादळामुळे वाऱ्याचा वेगही वेगवान असेल. 75 किमी प्रति तास ते 95 किमी प्रतितास वेग असू शकतो. वादळामुळे मुसळधार पाऊस देखील होऊ शकतो, ज्यामुळे अनेक सखल जिल्ह्यांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. ओडिशाच्या दक्षिण भागातील डोंगराळ भागात अचानक पूर येण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे गंजम आणि पुरी शहरी भाग जलमय होऊ शकतात.

सात जिल्ह्यात मदत पथके तैनात

विशेष मदत आयुक्त (एनआरसी) पीके जेना यांनी चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन ओडिशा आपत्ती जलद कृती दलाच्या (ओडीआरएएफ) 42 पथकं आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) 24 पथकांसह 102 अग्निशमन दलांना तैनात केलं आहे. गजपती, गंजम, रायगड, कोरापुट, मलकनगिरी, नबरंगपूर आणि कंधमाल अशा सात जिल्ह्यांमध्ये टीम पाठवण्यात आल्या आहे.  

टॅग्स :cycloneचक्रीवादळRainपाऊसAndhra Pradeshआंध्र प्रदेशOdishaओदिशाlandslidesभूस्खलन