शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पती जिवंत असताना शेकडो महिलांनी लाटली विधवांना दिली जाणारी पेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 15:26 IST

Uttar Pradesh News : प्रशासनाने आतापर्यंत अशी १०६ प्रकरणे उघडकीस आणली आहेत. तर अशा ८९१ महिलांची खाती सापडली आहेत. ज्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. मात्र आतापर्यंत त्यांच्या बँक खात्यात पेन्शनची रक्कम जात आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यात घडला हा प्रकार या महिलांना दिली जाणारी पेन्शन बंद करण्याचे बदायूंच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश पेन्शनच्या रूपात आतापर्यंत या महिलांना देण्यात आलेली रक्कमही वसूल करण्यात येणार

लखनौ - पती जिवंत असताना तो मृत असल्याचे दाखवून शोकडो महिलांनी विधवा पेन्शन योजनेमधून देण्यात येणाऱ्या पेन्शनचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यात घडला असून, प्रशासनाने आतापर्यंत अशी १०६ प्रकरणे उघडकीस आणली आहेत.बदायूंच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली असून, या महिलांना दिली जाणारी पेन्शन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या महिलांना आतापर्यंत देण्यात आलेली रक्कमसुद्धा वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रोबेशन अधिकारी संतोष कुमार यांनी बुधवारी सांगितले की, जिल्ह्यात एकूण १०६ महिला अशा आहेत. ज्यांनी आपल्या पतीला मृत दर्शवून पेन्शनचा लाभ घेतला आहे.त्यांनी सांगितले की, काही अशीही प्रकरणे आहेत ज्यामध्ये महिलांच्या पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी पेन्शन घेण्यास सुरुवात केली होती. मात्र दुसऱ्या विवाहानंतर ती बंद करण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये पती जीवित असलेल्या महिलांची पेन्शन रोखण्यात येत आहे आणि पेन्शनच्या रूपात आतापर्यंत त्यांना देण्यात आलेली रक्कमही वसूल करण्यात येणार आहे.त्यांनी सांगितले की, अशा ८९१ महिलांची खाती सापडली आहेत. ज्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. मात्र आतापर्यंत त्यांच्या बँक खात्यात पेन्शनची रक्कम जात आहे. आता ही पेन्शन बंद करण्यात येईल. या संपूर्ण घटनेबाबत बदायूंचे जिल्हाधिकारी कुमार प्रशांत म्हणाले की, काही तक्रारी मिळाल्या आहेत. त्यांचा तपास सुरू आहे. ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ज्यामध्ये निरंतर तपास सुरू राहतो. तसेच योग्य ती कारवाई होत असते, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी