शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

घंटागाडीचा ठेका पाच वर्षांसाठी मनसे पाच पाऊल मागे : विरोधानंतर ठरावात बदल, करवाढ मात्र फेटाळली

By admin | Updated: December 12, 2015 00:18 IST

नाशिक : सर्व पक्षांच्या सदस्यांचा विरोध डावलून घंटागाडीचा ठेका दहा वर्षे कालावधीसाठी देण्याचा निर्णय महासभेत घेणार्‍या सत्ताधारी मनसेनेअखेर पाच पावले मागे येत ठेका पाच वर्षे कालावधीसाठी देण्यास संमती दर्शविली असून, पाच वर्षांचे कामकाज पाहून पुढे दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय त्यावेळच्या सभागृहाने घ्यावा, असा ठराव महापौरांनी नगरसचिव विभागाला पाठविला आहे. दहा वर्षांच्या ठेक्याला प्रचंड विरोध झाल्यानंतर मनसेने सदर निर्णयात बदल केला आहे मात्र यूजर्स चार्जेसच्या माध्यमातून कोणतीही करवाढ नागरिकांवर न लादण्यावरही शिक्कामोर्तब केले आहे.

नाशिक : सर्व पक्षांच्या सदस्यांचा विरोध डावलून घंटागाडीचा ठेका दहा वर्षे कालावधीसाठी देण्याचा निर्णय महासभेत घेणार्‍या सत्ताधारी मनसेनेअखेर पाच पावले मागे येत ठेका पाच वर्षे कालावधीसाठी देण्यास संमती दर्शविली असून, पाच वर्षांचे कामकाज पाहून पुढे दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय त्यावेळच्या सभागृहाने घ्यावा, असा ठराव महापौरांनी नगरसचिव विभागाला पाठविला आहे. दहा वर्षांच्या ठेक्याला प्रचंड विरोध झाल्यानंतर मनसेने सदर निर्णयात बदल केला आहे मात्र यूजर्स चार्जेसच्या माध्यमातून कोणतीही करवाढ नागरिकांवर न लादण्यावरही शिक्कामोर्तब केले आहे. घंटागाडीच्या ठेक्याचा वाद गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित आहे. आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डॉ. प्रवीण गेडाम यांनी एप्रिल २०१५ मध्ये घंटागाडीचा सुमारे ३०० कोटी रुपयांचा ठेका दहा वर्षांसाठी देण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम महासभेवर ठेवला होता. त्यावेळी महापौर अशोक मुर्तडक यांनी सभागृहाचा कल लक्षात घेता घंटागाडीचा ठेका तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीकरिता देऊ नये आणि विभागनिहाय ठेका देण्याचा निर्णय जाहीर केला होता. याशिवाय सिंहस्थ पर्वणीपूर्वी निविदाप्रक्रियाही राबविण्याचे आदेशित केले होते, परंतु प्रशासनाने त्याची अंमलबजावणी न करता दहा वर्षे कालावधीसाठीच ठेका देण्याचा हेका कायम ठेवला होता. दरम्यान, दहा दिवसांपूर्वी झालेल्या विशेष महासभेत घंटागाडीच्या ठेक्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने मान्यतेसाठी पुन्हा ठेवला, परंतु त्यात किती वर्षे कालावधीसाठी ठेका द्यायचा, याचे विश्लेषण केले नव्हते. मात्र, गेल्या सोमवारी (दि.७) झालेल्या महासभेत घंटागाडीसंबंधीचा प्रस्ताव पुरवणी टीपणी जोडून प्रशासनाने मांडताना त्यात दहा वर्षे कालावधीचा स्पष्ट उल्लेख केला. घंटागाडीचा ठेका दहा वर्षे कालावधीसाठीच देण्याच्या प्रशासनाच्या दुराग्रहाचा सदस्यांनी खरपूस समाचार घेतला होता. त्याचवेळी सत्ताधारी घटक पक्षातील कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि अपक्ष गटानेही दहा वर्षे कालावधीसाठी ठेका देण्यास कडाडून विरोध दर्शविला, तर सेना, भाजपा व माकपानेही विरोधाची भूमिका घेतली होती. परंतु, सत्ताधारी मनसेकडून ठेका दहा वर्षे कालावधीसाठी देण्याचा कल लक्षात आल्यानंतर सेना-भाजपाने मतदानाची मागणी करणारे पत्र नगरसचिवांकडे दिले. सेना-भाजपाची व्यूहरचना पाहून महापौरांनी प्रशासनाचा दहा वर्षे कालावधीचा प्रस्ताव यूजर्स चार्जेससह मंजूर करून टाकला आणि गोंधळाला सुरुवात झाली. सभा संपल्यानंतरही सेना-भाजपाच्या सदस्यांनी सभागृहात मनसेच्या निर्णयाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली तर सेनेने बेकायदेशीर ठरावासह यूजर्स चार्जेसविरोधी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. महापौरांनी घेतलेल्या निर्णयावर गेल्या चार-पाच दिवसांपासून विरोधकांकडून टीकेची झोड उठली होती. अखेर विरोधाचा सूर पाहता एकाकी पडलेल्या मनसेने घंटागाडीचा ठेका दहा वर्षांवरून पाच वर्षे कालावधीसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच वर्षांच्या कालावधीसाठी ठेका दिल्यानंतर संबंधित ठेकेदाराने जर चांगली कामगिरी दाखविली, तर त्याला पुढे आणखी दोन वर्षे मुदतवाढ देण्याची तरतूदही ठरावात करण्यात आली. मात्र, सदर निर्णय त्यावेळच्या सभागृहाने घ्यायचा असल्याची माहिती महापौर अशोक मुर्तडक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.इन्फोयूजर्स चार्जेस नाहीप्रशासनाच्या प्रस्तावात सुरतच्या धर्तीवर नागरिकांकडून कचरा संकलनाकरिता यूजर्स चार्जेस आकारण्याचेही नमूद करण्यात आले होते. नागरिकांकडून किमान वार्षिक ६०० रुपये शुल्क आकारणीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. महापौरांनी सरसकट प्रस्ताव मंजूर केल्याने यूजर्स चार्जेसचाही भुर्दंड नाशिककरांवर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती, परंतु स्मार्ट सिटीच्या प्रस्तावात करवाढ फेटाळून लावणार्‍या सत्ताधारी मनसेने घंटागाडीच्या ठेक्याला मंजुरी देताना यूजर्स चार्जेसचाही प्रस्ताव फेटाळून लावला आहे.