शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

"मी सनातन धर्माचा…"; गीता पठणासंदर्भात हुमायूं कबीर यांचं वक्तव्य, केली मोठी घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 14:22 IST

कबीर पुढे म्हणाले, "पठणाच्या दोन दिवसांनंतर, बाबरी मशिदीचे काम धूमधडाक्यात सुरू करण्यात येईल. ज्या ठिकाणी बाबरी मशीत तयार होईल, त्याच ठिकाणी...

पश्चिम बंगालमध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी केल्यानंतर, आता आमदार हुमायूं कबीर कुरान पाठनाच्या भव्य आयोजनाची तयारी करत आहेत. ते बुधवारी म्हणाले, मी सनातन धर्माचा आदर करतो. रविवारी कोलकात्यात मोठ्या प्रमाणावर गीती पठणाचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय, त्यांनी 22 डिसेंबरला नव्या राजकीय पक्षाच्या घोषणेचीही तयारी केली आहे.

एएनआयसोबत बोलताना, गीता पठणासंदर्भात  विचारलेल्या प्रश्नावर कबीर म्हणाले, “सनातन धर्माच्या लोकांनी गीता पाठ केले. मी त्यांचा आदर करतो, त्यांच्याप्रति माझ्या मनात नितांत श्रद्धा आहे. मीही एक लाख लोकांसह कुरान पाठ करणार आहे. यात, बंगालातील 90 हजार आणि देशातील इतर राज्यांतून आलेले 10 हजार, अशा एकूण एक लाख लोकांचा समावेश असेल.”

कबीर पुढे म्हणाले, "पठणाच्या दोन दिवसांनंतर, बाबरी मशिदीचे काम धूमधडाक्यात सुरू करण्यात येईल. ज्या ठिकाणी बाबरी मशीत तयार होईल, त्याच ठिकाणी मंडप टाकून, शामियाना उभारून पठण केले जाईल. तत्पूर्वी  रविवारीही त्यांनी, आपण फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणावर ‘कुरान ख्वानी’चे आयोजन करणार आहोत, असे म्हटले होते. 

भव्य गीता पठणाचे आयोजन - तत्पूर्वी, कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राउंडवर रविवारी भगवद गीतेचे सामूहिक पाठण करण्यात आले. यात साधू-साध्वींसह मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे एक लाख लोकांनी गीतेच्या पहिल्या, नवव्या आणि अठराव्या अध्यायाचे पठण केले. केंद्रीय मंत्री सुकांत मजूमदार, शुभेंदु अधिकारी, माजी खासदार लॉकेट चटर्जी तथा आमदार अग्निमित्रा पॉल आदी नेते उपस्थित होते. 

याशिवाय, कार्तिक महाराज नावाने ओळखले जाणारे, स्वामी प्रदीप्तानंद महाराज तथा बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्रीसारखे काही प्रमुख धार्मिक नेतेही यावेळी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Humayun Kabir: Quran recitation planned, respects Sanatan Dharma.

Web Summary : Humayun Kabir plans a large Quran recitation, respecting Sanatan Dharma. Following Gita recitations, he will organize a Quran Khwani with one lakh participants and start Babri Masjid work. He is also set to announce a new political party.
टॅग्स :west bengalपश्चिम बंगालPoliticsराजकारणTrinamool Congressतृणमूल काँग्रेस