शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

हम दिल दे चुके सनम... पतीनेच प्रियकरासोबत लावून दिलं पत्नीचं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 16:18 IST

बंगळुरू येथील युवकाशी संबंधित ही घटना असून 26 डिसेंबर रोजी पतीने आपल्या पत्नीचा विवाह तिच्या प्रियकराशी लावून दिला. जुमई जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील हे तिघेजण रहिवाशी आहेत.

ठळक मुद्देविकासने पत्नीलाही आपल्या कंपनीत कामाला लावले, दरम्यान येथेच सचिन कुमार या युवकाशी शिवानीची ओळख झाली. त्यानंतर, गप्पागोष्टीतून मैत्री आणि मैत्रीनंतर दोघांमध्ये प्रेमही झाले

पाटणा - चित्रपटाला साजेल अशी घटना बिहारच्या जुमई जिल्ह्यात घडली आहे. सन 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील कथानकाप्रमाणेच घडलेल्या या प्रेमकहानीची सध्या जिल्ह्यात चर्चा आहे. आपल्या पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून देण्याचं धाडसी काम येथील तरुणाने केलंय. पतीसमोरच आपल्या प्रियकरासोबत पत्नी निघून जात असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

बंगळुरू येथील युवकाशी संबंधित ही घटना असून 26 डिसेंबर रोजी पतीने आपल्या पत्नीचा विवाह तिच्या प्रियकराशी लावून दिला. जुमई जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील हे तिघेजण रहिवाशी आहेत. खैरा येथील डांसिडीह गावाताली गुरु रविदास यांची मुलगी शिवानी कुमारीचे लग्न दोन वर्षांपूर्वी बल्थर गावातील विकास दास यांच्यासोबत झाले होते. दोघेही पती-पत्नी एकत्र राहात होते. विकास हा बंगळुरू येथील एका कंपनीत नोकरी करत होता. त्यामुळेच, लग्नानंतर आपल्या पत्नीला घेऊन विकास बंगळुरूला गेला. 

विकासने पत्नीलाही आपल्या कंपनीत कामाला लावले, दरम्यान येथेच सचिन कुमार या युवकाशी शिवानीची ओळख झाली. त्यानंतर, गप्पागोष्टीतून मैत्री आणि मैत्रीनंतर दोघांमध्ये प्रेमही झाले. या दोघांमध्ये जवळीकता एवढी वाढली की शिवानीने सचिन कुमारसोबत राहण्याबाबत पतीला विचारणा केली. पत्नीची इच्छा आणि तिचे सचिनकुमारवरील प्रेम लक्षात घेऊन विकासने एक पाऊल पुढे टाकत निर्णय घेतला. स्वत: साक्षीदार बनून त्याने पत्नी शिवानीचे लग्न सचिन कुमारसोबत लावून दिले. या लग्नाची पंचक्रोशीत चर्चा रंगली असून यासंदर्भात नातेवाईकांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान, हम दिल दे चुके सनम चित्रपटातील अजय देवगणच्या भूमिकेत विकास तर सलमान खानच्या भूमिकेत सचिन कुमार दिसून आला असून ऐश्वर्या रायची जागा शिवानीने घेतली आहे. त्यामुळे, फिल्मी स्टाईल सत्यकथेची जोरदार चर्चा होत आहे.  

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टBengaluruबेंगळूरmarriageलग्नPoliceपोलिस