भोपाळ: सत्ताधारी काँग्रेस आघाडीतले आठ आमदार मंगळवारी मध्यरात्री हरयाणातल्या मानेसरमधल्या एका हॉटेलमध्ये पोहोचले. भाजपानं या आमदारांना ओलीस ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसनं केला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तांतर घडवण्यासाठी भाजपाकडून आमदारांची खरेदी सुरू असल्याचा आरोपही काँग्रेसनं केला आहे. मानेसरमधल्या हॉटेलमध्ये असलेल्या आठ आमदारांपैकी चार आमदारांनी कमलनाथ सरकारला बाहेरुन पाठिंबा दिला आहे. तर एक काँग्रेस आमदार दिग्विजय सिंह यांच्या गटातला आहे.
मध्य प्रदेशात राजकीय भूकंप? भाजपानं आठ आमदारांना ओलीस ठेवलं; काँग्रेसचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 08:19 IST
राज्यात सत्तांतर घडवण्यासाठी भाजपाकडून सौदेबाजी; काँग्रेसच्या आरोपानं खळबळ
मध्य प्रदेशात राजकीय भूकंप? भाजपानं आठ आमदारांना ओलीस ठेवलं; काँग्रेसचा गंभीर आरोप
ठळक मुद्देकाँग्रेस आघाडीतले आठ आमदार हरयाणातल्या एका हॉटेलमध्येभाजपाकडून आमदारांच्या खरेदीचे प्रयत्न होत असल्याचा काँग्रेसचा आरोपकाँग्रेसमध्ये अंतर्गत वाद, हॉटेलमधल्या आमदारांशी संबंध नाही; भाजपाचा दावा