कसे मिळणार उपचार ?

By Admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:35+5:302015-09-03T23:05:35+5:30

How will he treat? | कसे मिळणार उपचार ?

कसे मिळणार उपचार ?

>जिल्हा परिषद : वैद्यकीय अधिकाऱ्यांची १४ पदे रिक्त
नागपूर : ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार मिळत असल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून केला जात आहे. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांची १४ पदे रिक्त असताना जिल्ह्यातील रुग्णांना उपचार कसे मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जि.प.चे ४९ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रात एमबीबीएस व बीएएमएस अशा दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. यातील ११ एमबीबीएस डॉक्टर उच्च शिक्षणासाठी दीर्घ रजेवर आहेत. त्यातच गुरुवारी पाच डॉक्टरांच्या बदल्या करण्यात आल्या. यात धापेवाडा येथील डॉ. एस.आर.निकम यांची मध्यवर्ती कारागृहात, कान्होलीबारा येथील डॉ. सरिता खोडवे यांची वर्धा येथे तर नवेगाव खैरी येथील उमेश थुटे यांची गलगंड सर्वेक्षण विभागात बदली करण्यात आली आहे. या ठिकाणी नवीन डॉक्टरांची नियुक्ती न केल्याने ही पदे रिक्त झाली आहेत. तसेच मौदा येथील डॉ. श्रद्धा नांदूरकर यांची कामठी येथील शासकीय रुग्णालयात तर हिराबाजार येथील डॉ.हरीश महत यांची नरखेड येथे बदली करण्यात आली आहे.
११ वैद्यकीय अधिकारी उच्च शिक्षणासाठी दीर्घ रजेवर आहेत. यात डॉ. एम.जी.मोरे (व्याहाड),डॉ. भूषण उरिले (सिर्सी), डॉ. असीम इमानदार (मौदा),डॉ. जफ्फार अली (कोदामेंढी),डॉ. माधवी गावंडे (चिचोली),डॉ. दीक्षा शंभरकर (कचारीसावंगा),डॉ. मिलिंद सोमकुुंवर (कळमेश्वर), डॉ. विद्यानंद गायकवाड (कामठी), डॉ. साईनाथ तोडकर (मेंढला),डॉ. दिनेश डवरे (सावरगाव) व डॉ. विजय बन्सोड (येनवा)आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: How will he treat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.