शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कसे उघडले ‘दक्षिणेचे दार’? भारत जाेडाे यात्रा ठरली टर्निंग पाॅइंट...! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 06:44 IST

रणदीप सुरजेवाला यांनी आपले विश्वासू प्रोफेसर गौरव वल्लभ यांच्याकडे मीडियातील प्रचाराची रणनीती ठरवण्याचे काम सोपविले होते. यातूनच ४० टक्के कमिशन, पाच आश्वासने, नंदिनी दूध तसेच महागाई आदी स्थानिक मुद्द्यांना केंद्रस्थानी धरून प्रचाराची रणनीती आखली होती.

आदेश रावल -नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जोरदार विजय मिळाला आहे. प्रचाराची सारी सूत्रे काँग्रेसच्या ‘वॉररूम’मधून निवडणूक रणनीतीकार सुनील कानूगोलू आणि पक्षाचे महासचिव तसेच कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला हलवित होते. रणदीप सुरजेवाला यांनी आपले विश्वासू प्रोफेसर गौरव वल्लभ यांच्याकडे मीडियातील प्रचाराची रणनीती ठरवण्याचे काम सोपविले होते. यातूनच ४० टक्के कमिशन, पाच आश्वासने, नंदिनी दूध तसेच महागाई आदी स्थानिक मुद्द्यांना केंद्रस्थानी धरून प्रचाराची रणनीती आखली होती. निवडणूक प्रचारात उद्योगपती गौतम अदानी आणि चीनसारख्या राष्ट्रीय मुद्द्यांचा उल्लेखही करायचा नाही, यासाठी राहुल गांधी यांना राजी करण्यात आले होते. काँग्रेसने जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदीचे आश्वासन दिले होते. काँग्रेसकडून ही मोठी चूक झाली, असे मानले जात होते. परंतु हा काँग्रेसच्या रणनीतीचा एक भाग होता. दलित समाजाची मते मिळविण्यासाठी काँग्रेसने जाणीवपूर्वक ही खेळी केली होती. कर्नाटकमध्ये अनेक दलित युवकांची हत्या केल्याचा आरोप बजरंग दलाच्या नेत्यांवर होता. यामुळे दलित समाजात या संघटनेविषयी कमालीचा राग होता. 

स्ट्राइक रेट ६६% - मतदारांना भावली भारत जोडो यात्रा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कर्नाटकमध्ये २१ दिवस होती. तिचा प्रवास झालेल्या सात जिल्ह्यांमध्ये ४८ विधानसभा जागा आहेत. त्यातील ३२ जागा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसने जिंकल्या. म्हणजे काँग्रेसचा तेथील स्ट्राइक रेट ६६ टक्के आहे. २०१८च्या विधानसभा निवडणुकांत या सात जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने फक्त १५ तर भाजपने १७ जागा जिंकल्या होत्या. पण, यंदा काँग्रेसने हे सर्व जिल्हे काबीज केले आहेत.

५११ किलाेमीटरचा प्रवास २१ दिवसांमध्येदेशात सध्या लोकांमध्ये द्वेष पसरविण्याचे काम सुरु आहे, समाजामध्ये फूट पा़डली जात आहे. पण, मी जनतेमध्ये प्रेम वाटण्यासाठी आलो आहे, असा संदेश राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान दिला होता. यामुळे प्रभावित झालेल्या लोकांनाही २१ दिवसांत या यात्रेला भरभरून प्रतिसाद दिला होता. 

काँग्रेसचे अभिनंदन -काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकांत विजय मिळाला. त्याबद्दल त्या पक्षाचे मन:पूर्वक अभिनंदन. जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काँग्रेस करणार असलेल्या प्रयत्नांकरिता मी शुभेच्छा देतो.    - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे