शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

कसा होता भारताचा वारसा कर कायदा?; माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केला होता रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 10:01 AM

१९८५ मध्ये हा कायदा राजीव गांधी सरकारने संपविला

नवी दिल्ली : भारतात ‘वारसा कर कायदा’ (इनहेरिटन्स टॅक्स लॉ) लागू करायला हवा, असे वक्तव्य इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केले आहे. त्यावरून खळबळ उडाली आहे. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी काँग्रेसवर हल्ला केला आहे. वास्तविक, पूर्वी भारतात ‘वारसा कर’ लागू होता. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी हा कर रद्द केला होता. 

कर ब्रिटनमध्येब्रिटनमध्ये ३.३७ कोटींपेक्षा जास्त संपत्तीवर ४०% दराने वारसा कर लागतो. जपानमध्ये ५५ टक्के वारसा कर लागतो. प्रत्येक वारसास मृताच्या संपत्तीत जेवढा हिस्सा मिळतो, त्यानुसार कर लागतो. 

काय आहे वारसा कर?एखादी व्यक्ती मरण पावल्यास त्याची संपत्ती वारसदारांच्या नावे करण्यासाठी सरकार काही कर घेते त्यास ‘वारसा कर’ म्हणतात. 

का संपवला कायदा?भारतातील या कायद्यामुळे ना आर्थिक समानता आली ना मोठी करवसुली झाली. त्यामुळे १९८५ मध्ये हा कायदा राजीव गांधी सरकारने संपविला. सन १९८४-८५ मध्ये इस्टेट ड्युटी ॲक्टद्वारे २० कोटी कर मिळाला आहे. तो वसूल करण्यासाठी सरकारचा त्यापेक्षा जास्त पैसा खर्च झाला. या करामुळे असंख्य खटले उभे राहिले. त्यावरही सरकारचा मोठा खर्च झाला.

भारतातील वारसा कर कायदा काय होता?भारतात १९८५ पर्यंत वारसा कर कायदा लागू होता. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी हा कायदा संपविला. १९५३ साली ‘इस्टेट ड्युटी ॲक्ट’ नावाने हा कायदा संसदेने मंजूर केला होता. मृताची संपत्ती ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असल्यास ८५ टक्क्यांपर्यंत हा कर लागत असे. उत्पन्नातील असमानता दूर करण्यासाठी हा कर आणला गेला होता.

अमेरिकेत किती कर?अमेरिकेत ज्या व्यक्तीला पैसा, मालमत्ता वा अन्य कोणत्याही प्रकारचे लाभ वडिलोपार्जित पद्धतीने मिळाले असतील त्याला हा कर भरावा लागतो. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीच्या हस्तांतरणप्रसंगी लागू होणाऱ्या कराचे प्रमाण १ ते १० टक्के आहे.

६ राज्यांत लागूसध्या अमेरिकेतील आयोवा, केंटुकी, मॅरीलँड, नेब्रास्का, न्यू जर्सी आणि पेन्सिल्वेनिया या ६ राज्यांत हा कर लागू आहे. आयोवामधून २०२५ पर्यंत हा कर रद्द केला जाणार आहे.

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधी