शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचे गोडवे गाण्यासाठी अधिकाऱ्यांची तयारी; कार्यक्रमाआधी सामान्यांची शिकवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 16:02 IST

मुख्यमंत्र्यांना सर्व काही ऑल इज वेल दिसावं यासाठी अधिकाऱ्यांच्या सर्वसामान्यांना सूचना

हाजीपूर: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. अजूनही देशात दररोज दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे सर्वच राज्यं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार अनेक जिल्ह्यांची वर्च्युअल टूर करून तेथील स्थितीचा आढावा घेत आहेत. लोकांशी थेट संवाद साधून प्रत्यक्षात असलेल्या परिस्थितीची माहिती घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र यावर प्रशासनातील अधिकारी पाणी फिरवताना दिसत आहेत.राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलंबिहारच्या वैशाली जिल्ह्यातील एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. यामध्ये अधिकारी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करून सगळं ठीक आहे, हे कसं सांगायचं याची शिकवणी घेताना दिसत आहेत. मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हाजीपूरमधील सामुदायिक स्वयंपाकघराचा व्हर्च्युअल आढावा घेणार होते. त्या ठिकाणी सकाळपासूनच मोठी तयारी पाहायला मिळाली. बॅनर, पोस्टरसोबत स्वच्छतादेखील ठेवण्यात आली होती. कोणीही उपाशी राहू नये या उद्देशानं सामुदायिक स्वयंपाकघराची सुरुवात करण्यात आली.माणुसकी! मुलगा कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये, वृद्ध मातेचा मृत्यू; डॉक्टरने केले अंत्यसंस्कारमुख्यमंत्री सामुदायिक स्वयंपाकघराचा आढावा घेण्याआधी तिथला एक व्हिडीओ समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांना सगळं काही व्यवस्थित वाटावं, यासाठी अधिकाऱ्यांनी उपस्थित असलेल्यांना काय बोलायचं याबद्दलचे धडे दिले. मुख्यमंत्र्यांपर्यंत कोणतीही तक्रार पोहोचू नये याची व्यवस्था अधिकाऱ्यांनी केली. मुख्यमंत्र्यांना काय सांगायचं, स्वत:चं म्हणणं कसं मांडायचं, सर्व ठीक आहे म्हणायचं, याचे धडे अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांना दिले. अधिकाऱ्यांच्या या शिकवणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNitish Kumarनितीश कुमार