शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
3
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
4
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
5
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
6
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
7
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
8
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
9
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
10
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
11
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
12
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
13
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
14
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
15
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
16
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
17
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
18
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
19
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
20
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 17:54 IST

आज बिहार निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे, या निवडणुकीत आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे विधानसभेची निवडणूक लढवत आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. बिहारमध्ये एनडीए मोठ्या विजयाच्या उंबरठ्यावर आहे. दरम्यान, या निवडणुकीत आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे मैदानात आहेत. मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.

या निवडणुकीत लांडे तिसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांना आतापर्यंत ९,७४६ मते मिळाली आहेत. दरम्यान, जमालपूर येथील जेडीयूचे नचिकेत यांनी ५२,७७९ मते मिळवून निर्णायक आघाडी घेतली आहे. नरेंद्र कुमार यांना ३२,८४३ मते मिळाली आहेत.

तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...

जमालपूर मतदारसंघातील समीकरणे बदलली

जमालपूर विधानसभेमधील राजकीय समीकरणे यावेळी पूर्णपणे बदलली आहेत. जेडीयूने मोठी खेळी करत माजी मंत्र्यांना तिकीट नाकारले आणि नचिकेता मंडल यांना उमेदवारी दिली. तिकीट नाकारल्यामुळे माजी मंत्र्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. 

महाआघाडीच्या बाजूने, आयआयपी पक्षाचे नरेंद्र तांती दलित-महादलित मतपेढी आणि संघटनात्मक ताकदीवर अवलंबून राहून या जागेवरून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा प्रभाव आणि लोकप्रियता आहे, दुसरीकडे, जेडीयूच्या नवीन रणनीती आहेत आणि तिसऱ्या बाजूला, महाआघाडीची ताकद आहे. 

तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली

बिहारच्या 'हॉट सीट' पैकी एक असलेल्या राघोपूरमध्ये तेजस्वी यादव बऱ्याचदा पिछाडीवर पडत चालले होते. परंतू, अखेरच्या मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये मोठा उलटफेर झाला असून २२ व्या फेरीअखेर तेजस्वी यांनी ८५२३ तर २३ व्या फेरीअखेर ११४८१ मतांनी आघाडी मिळविली आहे. 

या आघाडीमुळे आता तेजस्वी यादवांचा विजय निश्चित मानला जात आहे. सतत पिछाडीवर असलेल्या तेजस्वींनी भाजपच्या सतीश कुमार यांना मागे टाकले आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार सतीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना सातत्याने पिछाडीवर ठेवल्यामुळे लालू कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, मतमोजणीच्या महत्त्वाच्या टप्प्यात तेजस्वी यादव यांनी जबरदस्त कामगिरी करत ही पिछाडी भरून काढली आणि भाजपच्या उमेदवारावर मोठी आघाडी घेतली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar: Shivdeep Lande's election performance; JDU candidate leads.

Web Summary : In Bihar's election, IPS officer Shivdeep Lande contested from Jamalpur as an independent and secured 9,746 votes, placing third. JDU's Nachiket leads with 52,779 votes. Tejashwi Yadav gained a significant lead in Raghopur, likely securing his victory.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Electionनिवडणूक 2024Result Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूक