बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 19:53 IST2025-11-04T19:52:58+5:302025-11-04T19:53:46+5:30
या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरलेला नवखा पक्ष म्हणजे, प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष. या पक्षाचा विचार करता, संबंधित सर्वेक्षणानुसार जनसुराज पक्षाला...

बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. एनडीए आणि महागठबंधन दोघेही सत्तेत येण्याचा दाव करत आहेत. यातच प्रसिद्ध एजन्सी आयएएनएस–मॅटराईजच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज आहे. या ओपिनियन पोलनुसार एनडीएला 153 ते 164 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरलेला नवखा पक्ष म्हणजे, प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष. या पक्षाचा विचार करता, संबंधित सर्वेक्षणानुसार जनसुराज पक्षाला केवळ 1 ते 3 जागाच मिळत आहे. हा आकडा प्रशांत किशोर यांच्या दाव्यापेक्षा फारच छोटा आहे. याशिवाय या पक्षाला एकूण 4 टक्के मते मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. राज्यातील 243 पैकी 238 जागांवर जनसुराजचे उमेदवार रिंगणात आहेत. महत्वाचे म्हणजे, पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार लक्षात घेत, प्रशांत किशोर यांनी स्वतः कोणत्याही जागेवरून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
याशिवाय, सर्वेक्षणात असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएमलाही केवळ 1 टक्के मते मिळण्याचा अंदाज असून केवळ 1 ते 2 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच इतर काही लहान-सहान पक्षांना मिळून 8 टक्के मते आणि 0 ते 4 जागा मिळण्याचा अंदात आहे.
एनडीएला 153-164 जागा मिळण्याचा अंदाज -
भारतीय जनता पक्ष- 83-87 जागा
जनता दल यूनाइटेड- 61-65 जागा
हिंदुस्तान आवाम मोर्चा- 4-5 जागा
लोक जनशक्ती पाट्री - 4-5 जागा
राष्ट्रीय लोक मोर्चा- 1-2 जागा
महाआघाडीसाठा अंदाज -
राष्ट्रीय जनता दल- 62-66 जागा
काँग्रेस- 7-9 जागा
सीपीआय (ML)- 6-8 जागा
सीपीआय- 0-1 जागा
सीपीआय- (एम)- 0-1 जागा
विकासशील इंसान पार्टी - 1-2 जागा