शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारला 8 गुण देणाऱ्या नवीन पटनायकांना भाजपनं किती गुण दिले? काँग्रेसचाही हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 19:49 IST

पटनायक यांनी रविवारी एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे कौतुक करत, मोदी सरकारला परराष्ट्र नीती आणि गरीबी निर्मूलनाच्या कामासाठी 10 पैकी 8 गुण दिले होते.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला नुकतेच 10 पैकी 8 गुण दिले आहेत. मात्र, मोदी सरकारला 8 गुण देणाऱ्या बिजू जनता दलाच्या राज्य सरकारला भाजपने 'शून्य' गुण दिले आहेत. एवढेच नाही, तर काँग्रेसनेही पटनायक सरकारवर हल्ला चढवला असून, पटनायक यांचे सरकार भ्रष्टाचारात बुडाले असल्याचे म्हटले आहे.

पटनायक यांनी रविवारी एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे कौतुक करत, मोदी सरकारला परराष्ट्र नीती आणि गरीबी निर्मूलनाच्या कामासाठी 10 पैकी 8 गुण दिले होते.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते जयनारायण मिश्रा म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी (नवीन पटनायक) पंतप्रधानांच्या संपूर्ण कामगिरीसाठी 10 पैकी 10 गुण द्यायला हवे  होते. मात्र, मी प्रत्येक आघाडीवर पटनायक यांना त्यांच्या कामासाठी शून्य गुण देईन. पंतप्रधानांचे सरकार भ्रष्टाचार मुक्त आहे. तर पटनायक सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारात बुडाले आहे.”

काँग्रेस आमदार ताराप्रसाद बहिनीपती म्हणाले, मी राज्य आणि केंद्र सरकार दोन्हींनाही “मोठे शून्य” देईन. “ या दोघांनीही जनतेसाठी काहीही केले नाही,” असा आरोप त्यांनी केला. तर दुसऱ्या बाजूला, बीजदचे आमदार शशी भूषण बेहरा यांनी म्हटले आहे की, पटनायक यांना “मिश्रा तथा बहिनीपती यांच्याकडून रेटिंगची आवश्यकता नाही. ओडिशाच्या जनतेने पटनायक यांना सलग पाच वेळा मुख्यमंत्री करत पूर्ण गुण दिले आहेत.”

टॅग्स :OdishaओदिशाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस