शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आणखी किती काळ आपण भांडणार? शहा-राऊत यांची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 04:34 IST

राज्यसभेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत प्रत्येक मत महत्वाचे आहे. शिवसेनेची ३ मते रालोआच्या बाजूने आहेत की नाहीत, याविषयी अमित शहांना शंका होती.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत प्रत्येक मत महत्वाचे आहे. शिवसेनेची ३ मते रालोआच्या बाजूने आहेत की नाहीत, याविषयी अमित शहांना शंका होती. त्यासंबंधी शहा आणि संजय राऊत यांच्या खास भेटीची रंजक माहिती हाती आली आहे.जद (यु)चे हरिवंश यांना सत्ताधारी आघाडीने उमेदवार बनवल्यावर शंकेचे निरसन करण्यासाठी शहा थेट उध्दव ठाकरेंशी फोनवर बोलले. यावेळी संजय राऊत यांच्याशी बोला, असे त्यांनी शहांना सुचवले. मंगळवारी संसदेच्या आवारात शहा सकाळपासून राऊतांना शोधत होते. जेटलींच्या दालनात शहा तुमची वाट पहात आहेत असा निरोप एका दूतामार्फत राऊत यांना पाठवला. पण राऊत तिथे पोहोचेपर्यंत शहा राज्यसभा सभागृहात गेले होते. मग राऊतही तिथे गेले. राऊत यांना पहाताच शहांनी त्यांना आसनाजवळ बोलावले. शहा राऊतांना म्हणाले, ‘आणखी कितीकाळ आपण भांडणार आहोत? परवा हरिवंश यांची निवडणूक आहे. तुमची भूमिका नेमकी काय?’ त्यावर राऊत म्हणाले, ‘आपले भांडण आहे कुठे? काही मुद्यांवर मतभेद असलेच तर ते सोडवण्याचा फॉर्म्युला काय? ते तुम्हीच सांगा’. त्यावर शहा म्हणाले, ‘बाकीचे आपण नंतर पाहू, तूर्त उपसभापती पदाची महत्वाची निवडणूक आहे.’ राऊत त्यावर तत्परतेने म्हणाले ‘महाराष्ट्रातला मराठी उमेदवार जर मैदानात असेल तर शिवसेना त्याच्या बाजूने ठामपणे उभी राहिल याचे कारण आमची परंपरागत भूमिका तीच आहे’. यावेळी मागे बसलेल्या थावरचंद गहलोतांच्या समोरच्या माईकमुळे हे संभाषण अन्य सदस्यांनाही ऐकू येत होते. गहलोतांनी तसे दोघांना सांगितलेही. दरम्यान राऊतांचे उत्तर ऐकल्यावर शहा अस्वस्थ झालेले दिसले.>उपसभापती पदासाठी काँग्रेसचे बी. के. हरिप्रसादराज्यसभेच्या उपसभापती पदाची ९ आॅगस्टला होणारी निवडणूक सत्ताधारी आघाडीबरोबरच विरोधकांच्या एकजुटीचीही एकप्रकारे लिटमस टेस्टच आहे. रालोआतर्फे जद (यु)चे हरिवंश नारायण प्रसाद, तर विरोधकांतर्फे काँग्रेसचे बी. के. हरिप्रसाद अशी सरळ लढत आहे. गुप्त मतदान नसल्याने कोणता पक्ष कोणाच्या बाजूने आहे, हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAmit Shahअमित शाह