तुमचे मूल किती वेळ मोबाइल पाहते? अतिवापराचे परिणाम थेट शरीर अन् मनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 06:25 IST2022-03-26T06:24:31+5:302022-03-26T06:25:41+5:30
जवळपास २४ टक्के मुले झोपण्यापूर्वा मोबाइल पाहत असल्याचे निदर्शनास आले. केंद्र सरकारनेच ही माहिती संसदेत दिली आहे.

तुमचे मूल किती वेळ मोबाइल पाहते? अतिवापराचे परिणाम थेट शरीर अन् मनावर
मुलांच्या हातात मोबाइल ही आता ‘घर घर की कहानी’ झाली आहे. शाळेतून आले की मोबाइल, खेळून आले की मोबाइल, झोपण्यापूर्वी मोबाइल अशा मोबाइल पाहण्याच्या मुलांच्या वेळा ठरलेल्या असतात. याचाच अभ्यास नुकताच करण्यात आला. त्यात जवळपास २४ टक्के मुले झोपण्यापूर्वा मोबाइल पाहत असल्याचे निदर्शनास आले. केंद्र सरकारनेच ही माहिती संसदेत दिली आहे.
कोणी केला अभ्यास?
मुलांच्या मोबाइल सवयीविषयी ‘नॅशनल कमीशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स’ या संस्थेने अभ्यास केला.
इंटरनेटजोडणी असलेल्या स्मार्टफोनची हाताळणी आणि त्याचा मुलांवर होणारा शारीरिक, मानसिक आणि वर्तनात्मक परिणाम, हा या अभ्यासाचा विषय होता.
अभ्यासातून निघालेले निष्कर्ष
मुले झोपण्यापूर्वी मोबाइल पाहतात, असे या अभ्यासात निदर्शनास आले.
३७% मुलांची एकाग्रतेची पातळी सातत्याने मोबाइल स्क्रीनकडे पाहिल्याने घसरली.
माहिती तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही माहिती संसदेत दिली.
मुलांवर होणारे परिणाम
सतत मोबाइल पाहिल्याने मुलांच्या दृष्टीवर परिणाम होतो.
त्यामुळे डोळ्यांतून सारखे पाणी गळणे, दृष्टिदोष निर्माण होणे, चष्मा लागणे इत्यादी प्रकार घडतात
एकाग्रता भंग होण्याचे प्रमाणही आताच्या मुलांमध्ये वाढले आहे. त्यास मोबाइल कारणीभूत आहे.
पालकांनी मुलांना ठरावीक काळासाठीच मोबाइल हातात द्यावा. इतरवेळी त्यांचे लक्ष मैदानी खेळाकडे वळवावे, असा वैद्यकीय तज्ज्ञ सल्ला देतात.