शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक कशी होते? पाहायला येणार २५ देशांतील राजकीय नेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 12:15 IST

देशातील निवडणूक बनली ग्लोबल

संजय शर्मा नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल स्वरूप देत जगातील मोठ्या देशांतील २५ राजकीय पक्षांच्या नेत्यांना भारतात निवडणुका आणि सभा पाहण्यासाठी निमंत्रित केले आहे. 

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जगातील मोठ्या २५ राजकीय पक्षांच्या नेत्यांना देशात निवडणूक अभियान पाहण्यासाठी आणि भाजपचा निवडणूक प्रचार पाहण्यासाठी देशात बोलविले आहे. यातील १५ राजकीय पक्षांनी आपली सहमती दर्शविली आहे आणि आपल्या नेत्यांना भारतात सार्वत्रिक निवडणुका आणि पंतप्रधान मोदी यांच्या सभा पाहण्यासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक आणि भ्रष्टाचार हे दोन समानार्थी शब्द आहेत. द्रमुक द्वेष आणि विभाजनवादी राजकारण करत आहे, पक्षाला राज्याच्या विकासाची काळजी नाही.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

कोण कुठून येणार?ब्रिटनची कंजर्व्हेटिव्ह आणि लेबर पार्टी, जर्मनीतील ख्रिश्चियन डेमोक्रॅटिक आणि सोशल डेमोक्रॅट पार्टी, फ्रान्सची द रिपब्लिकन्स आणि नॅशनल रेली, जपानची लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी, इस्रायलची लिकुड, ऑस्ट्रेलियाची ऑस्ट्रेलियन लेबर पार्टी, रशियाची युनायटेड रशिया पार्टी, बांगलादेशमधील अवामी लीग यांचा समावेश आहे. नेपाळ आणि श्रीलंकेतील सर्व प्रमुख राजकीय पक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे. 

भाजपचा परराष्ट्र मंत्रालय विभाग करणार पाहुण्यांची व्यवस्थाnभाजपचा परराष्ट्रविषयक विभाग आणि परराष्ट्र मंत्रालय विदेशातून येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्था करणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विशेष ठिकाणांवरील सभा आणि रोड शो पाहण्यासाठी हे नेते जातील.nनिवडणुकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात म्हणजे पुढील महिन्यात मेमध्ये हे नेते देशात दाखल होतील. या नेत्यांसोबत भाजपच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या टीम राहतील. nत्या या नेत्यांना निवडणुकीबाबत माहिती देतील. भाजपचे अध्यक्ष नड्डा या नेत्यांसोबत चर्चा करतील. तसेच, त्यांच्या स्वागतासाठी डिनरचे आयोजन करतील.

टॅग्स :lok sabhaलोकसभाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४ElectionनिवडणूकIndiaभारत