लोकमत न्यूज नेटवर्क । नवी दिल्ली : एनडीए आणि इंडिया आघाडीनेही उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार जाहीर केले आहेत. या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक कशी असते, आतापर्यंत कोण-कोण उपराष्ट्रपती झाले आहेत, याची माहिती जाणून घेऊ...
कोण असतात मतदार?
उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत फक्त संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा सभागृहातील सदस्यच मतदान करतात.
कशी असते मतदानाची पद्धत?
बॅलेट पेपरद्वारे गुप्त मतदान. प्रत्येक मतदार उमेदवारांच्या पसंतीक्रमाने मतदान करतो (उदा. १, २, ३, ...).
आवश्यक पात्रता काय असावी लागते?
- उमेदवार भारताचा नागरिक असावा.
- किमान वय ३५ वर्षे पूर्ण असावे.
- राज्यसभेचा सदस्य होण्यास पात्र असावा.
- ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळवणारा उमेदवार विजयी होतो.
- निवडणूक आयोग या प्रक्रियेचे संपूर्ण आयोजन व मतमोजणी करतो.
उमेदवार कोण?
- एनडीए : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
- इंडिया : माजी न्यायमूर्ती बी. सूदर्शन रेड्डी
३९१ : विजयासाठी आवश्यक मते४२२ : एनडीएचे अंदाजित संख्याबळ
आतापर्यंतचे उपराष्ट्रपती व मते
- १९५२ सर्वपल्ली राधाकृष्णन बिनविरोध
- १९५७ सर्वपल्ली राधाकृष्णन बिनविरोध
- १९६२ झाकीर हुसेन ५६८ ४००
- १९६७ व्ही. व्ही. गिरी ४८३ ३४७
- १९६९ जी. एस. पठाण ४२४ २००
- १९७४ बी. डी. जत्ती ५२१ २८२
- १९७९ मोहम्मद हिदायतुल्ला बिनविरोध
- १९८४ आर. वेंकटरमण ३९८ २६५
- १९८७ शंकर दयाल शर्मा बिनविरोध
- १९९२ के. आर. नारायणन ७०० १
- १९९७ कृष्णकांत ४४१ २३१
- २००२ भैरोसिंह शेखावत ४५४ ३०५
- २००७ हमीद अन्सारी ४५५ २२२
- २०१२ हमीद अन्सारी ४९० २३८
- २०१७ वेंकैया नायडू ५१६ २४४
- २०२२ जगदीप धनखड ५२८ १८२